Pravin Mane Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Pravin Mane : हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची चर्चा, प्रवीण मानेंनी बंद दाराआड शरद पवारांना काय सांगितले?

Pravin Mane meet Sharad Pawar: प्रवीण माने म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे साहेबांना सांगितले. त्यांनी ते ऐकूण घेतले. साहेब देशाचे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात मी देखील आलो होतो.

Roshan More

Pravin Mane News : इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते, माजी आमदार हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रवीण माने यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. ते इंदापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छूक होते. मात्र,हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला तर त्यांचा उमेदवारीचा मार्ग खडतर होणार आहे.

आज (शनिवारी) प्रवीण माने, दशरथ माने यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. बंद दाराआड त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली.

प्रवीण मानेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे साहेबांना सांगितले. त्यांनी ते ऐकूण घेतले. शरद पवार जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळावी पण साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

साहेब देशाचे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात मी देखील आलो होतो. साहेबांसोबत संवाद करणं हा महत्त्वाचा क्षण असतो. साहेबांनी इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्न, वीजेचा प्रश्न यावर चर्चा केली, असे देखील प्रवीण माने यांनी सांगितले.

इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत. ते अजित पवार गटात आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत अजित पवार गटाकडे जाणार. त्यामुळे भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांनी तुतारी हाती घेत निवडणूक लढण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना सांगितले आहे.

एका कार्यक्रमाच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. ती चर्चा राजकीय नसल्याचे देखील हर्षवर्धन पाटील यांन स्पष्ट केले होते. मात्र, या भेटीनंतर पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. त्यामुळे जर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात आले तर प्रवीण माने काय निर्णय घेणार याची उत्सुकता इंदापूरच्या राजकारणात होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT