Bridge built by the Public Works Department over Indrayani River in a location with no connecting roads, as exposed by Mahesh Zhagde.  Sarkarnama
महाराष्ट्र

Indrayani River bridge : याला म्हणतात सरकारी कारभार! रस्ताच नसलेल्या ठिकाणी नदीवर पूल, महेश झगडेंनी पुरावाच दिला...

PWD Constructs Bridge Over Indrayani River : पीएमआरडीएचे माजी आयुक्त व निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत सरकारी यंत्रणेतील काही अधिकारी कसे काम करतात, याचा ढळढळीत पुरावाच दिला आहे.

Rajanand More

Mahesh Zhagde Presents Visual Proof : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे. नवीन पुलासाठी निधी मंजूर असताना अद्याप काम सुरू न झाल्याने चोहोबाजूने टीका होत आहे. तर जीर्ण झालेला पूलही पूर्णपणे बंद करण्यात आला नव्हता. या घटनेनंतर आता एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पीएमआरडीएचे माजी आयुक्त व निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी यावर प्रकाश टाकला आहे. झगडे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत सरकारी यंत्रणा कशी काम करते, याचा ढळढळीत पुरावाच दिला आहे. ते पीएमआरडीएचे आयुक्त असताना इंद्रायणी नदीवरील एक पूल त्यांनी पाहिला होता. रस्ता नसलेल्या ठिकाणी हा पूल पाहून त्यांनाही धक्का बसला होता.

झगडे यांनी म्हटले आहे की, महानगर आयुक्त,पीएमआरडीए या पदावर असताना, 2016 मध्ये मी संपूर्ण 7400 चौ. कि.मी.चा परिसर सातत्याने फिरत असे. पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, 1987 साली प्रादेशिक नियोजन आराखड्यात रिंग रोडचे नियोजन करण्यात आले होते. पण माझ्यापूर्वीचे अधिकारी “कशात” तरी इतके व्यग्र होते की, 29 वर्षे तो रिंग रोड प्रत्यक्षात आणण्याची त्यांना फुरसतच मिळाली नाही.

मी रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण 110 कि.मी.चा रस्ता स्वतः अधिकाऱ्यांच्या टीमसह—कधी पायी, कधी वाहनाने—प्रत्यक्ष फिरून पाहिला. अशाच एका पाहणी दौऱ्यात, देहूपुढे इंद्रायणी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पूल बांधलेला दिसून आला. हा विनोद समजावा की देशाच्या प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे, हा पूल पूर्णपणे बांधलेला होता, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता, अशी धक्कादायक माहिती झगडे यांनी या पोस्टमध्ये दिली आहे.

झगडे यांनी त्यावेळचा पुलाचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यापुढे त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही टोकांवर रस्ता नसतानाही हा पूल का बांधण्यात आला, याचे उत्तर मला मिळाले नाही. हा खर्च पूर्णपणे अनावश्यक होता. हाच निधी तिथे वापरण्यात आला असता, जिथे पुलाची तातडीची गरज होती, तर त्याचा निश्चितच जनतेला फायदा झाला असता, अशी अपेक्षाही झगडे यांनी व्यक्त केली आहे.

आता, इंद्रायणी नदीवरील कुंदमळा येथील पूल कोसळून जी जीवितहानी झाली, ती पाहता, अधिकाऱ्यांची कातडी किती बळकट झाली आहे, याची तीव्र जाणीव होते. ही भावना मी यापूर्वीही व्यक्त केली होती. अशा अधिकाऱ्यांनी तरी हा फोटो पाहून आपल्या बेफिकिरीची आणि प्रशासकीय विकृतीची जाणीव ठेवावी, ही किमान अपेक्षा, अशा शब्दांत झगडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT