Sharad Pawar 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'वस्तादा'चा आखाडा इच्छुक उमेदवारांनी भरणार, मुलाखतीच्या तारखा ठरल्या...

Sharad Pawar Nationalist Congress Party has announced the dates for interviews of interested candidates : महाविकास आघाडीचे जागा वाटप फायनल नसताच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्यात.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा रंगली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसह विरोधक महायुतीमधील पक्षांना देखील मागं टाकलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राज्यात विधानसभा निवडणुकीत 80 ते 85 जागा लढवण्याची तयारीत आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झालेले नाही. त्याच अगोदर शरद पवारांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. नवरात्रोत्सवात जागा वाटप निश्चित होईल, असं सांगितलं जातं आहे. काँग्रेस (Congress) सर्वाधिक जागा मागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील तेवढ्याच जागा मागितल्या आहे. यातच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वाद रंगला आहे. यात कोठेही काहीही मत प्रदर्शन न करता शरद पवार यांनी संघटन बांधणीवर भर देत, जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) पुण्याच्या गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डमधील निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखती घेणार आहेत. या मुलाखती उद्या शनिवारपासून पुढील तीन दिवस सुरू राहणार आहेत. शनिवारी (ता. 5) मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग (ता. 6) आणि उत्तर महाराष्ट्रासाठी (ता. 7) मुलाखती होतील. सकाळी साडेदहा वाजल्यापासून मुलाखती सुरू राहणार आहेत. मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील 24 जणांचे पार्लमेंटरी बोर्ड असणार आहे.

शरद पवार यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा, याचे फक्त अंदाज बांधले जात आहे. महाविकास आघाडीतून 99 टक्के जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील 97 जागांवर तिढा आहे, तो लवकर सुटले आणि जागा वाटप निश्चित होईल. पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट 80 टक्के राहिला आहे. विधानसभा निवडणुकीला देखील शरद पवार यांच्याकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. यातच शरद पवार यांच्याकडे सध्या 52 संभाव्य उमेदवार फायनल असल्याचे दिसते. त्यामुळे मुलाखती घेऊन शरद पवार निवडणुकीचं पुढचं मैदानात अधिक सोप करत आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT