Nana Patole News : जागावाटपाचं घोडं नेमकं कुठं अडलं; पटोलेंनी सांगितली महाविकास आघाडीची मोठी अडचण

Political News : कार्यकर्त्यांचा रोष असलेले काही मतदारसंघ महाविकास आघाडीने अद्याप फायनल केलेले नाहीत. अशा जागांवर लवकरच एकत्रित बसून तोडगा काढला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघात जागा वाटपावरून मोठा रोष उफाळून आला होता. सांगलीवर काँग्रेसचा दावा असताना शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे येथे काँग्रेसने बंडखोरी केली होती. हा अनुभव गाठीशी असल्याने कार्यकर्त्यांचा रोष असलेले काही मतदारसंघ महाविकास आघाडीने अद्याप फायनल केलेले नाहीत. अशा जागांवर लवकरच एकत्रित बसून तोडगा काढला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीवरुन महाविकास आघाडीत मोठा वाद उफाळून आला होता. काँग्रेसने (Congress) सुरुवातीपासूनच सांगलीवर दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये मोठा असंतोष उफाळून आला होता. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची त्यामुळे मोठी कोंडी झाली होती. (Nana Patole News)

या जागेवरून शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. मात्र शिवसेनेने (Shivsena) उमेदवार मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंड पुकारले होते. ते विजयीसुद्धा झाले आहेत. आता हा वाद क्षमला आहे. मात्र विधानसभेच्या जागा जास्त असल्याने अनेक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीत यावरून मिठाचा खडा पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. अद्याप एकाही पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केलेला नाही. कार्यकर्त्यांचा असंतोष असलेल्या वादाच्या जागा किती आहेत. त्या सांगण्यास नाना पटोले यांनी नकार दिला. त्या जागा फायनल केलेल्या नाहीत. मात्र नक्कीच यावर तोडगा निघेल, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Nana Patole
Jalna News : जालन्यातील मेडिकल कॉलेजवरून गोरंट्याल, खोतकरांमध्ये खडाजंगी

एमआयएमने 28 जागांचा प्रस्ताव दिला यावर पटोले यांनी मला माहिती नाही, माझ्याकडे कोणी प्रस्ताव घेऊन आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडत नसून त्यांना बाहेर काढले जात आहे. महायुतीत जागा वाटपावरून ज्या घडामोडी सुरू आहे हे स्पष्टपणे दिसून येते असे पटोले म्हणाले.

शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवावी, असे सांगितले. यावर पटोले यांनी राहूल गांधी यांची भूमिका त्या पलीकडे असल्याचे सांगितले. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही राहूल गांधी यांची मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेसने ही मागणी लावून धरली आहे, असे पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Vinayak Raut : विनायक राउतांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांची दांडी; ठाकरे गटाची परिस्थिती सचिवांसमोर उघड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com