Imtiaz Jaleel On Ambadas Danve : जलील यांनी दानवेंसह शिवसेनेच्या वर्मी घाव घातला...

MIM Imtiaz Jalil criticizes Shiv Sena Ambadas Danve : 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली.
Jaleel On Danve
Jaleel On Danve Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ''एमआयए'ला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत शिवसेना मुस्लिम विरोधात आम्ही नाही. जे देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत, त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे शिवसेनेला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही', असे विधान शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं होतं.

यावर 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आम्ही कुठले देश विघातक कृत्य केले? देश विघातक कृत्य आपले नेते बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, म्हणून त्यांना सहा वर्ष मतदान बंदी घातली होती, असा टोला लगावला.

'एमआयएम'चे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीतील शरद पवारसाहेबांची 'एनसीपी' आणि काँग्रेसबद्दल दुमत नाही. परंतु शिवसेना सेक्यूलर पक्ष आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर सहभागी होणार नाही. तसंच महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी इम्तियाज जलील यांनी, देखील प्रस्ताव शरद पवार यांच्या 'एनसीपी' आणि काँग्रेसकडे दिला. एकप्रकारे शिवसेनेला 'एमआयएम'ने डिवचलं आहे.

Jaleel On Danve
Ahmednagar Now Ahilyaanagar : लोकप्रिय निर्णयांचा धडाका; अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब, आता...

शिवसेनेचे (Shiv Sena) नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीमध्ये 'एमआयएम'ला घेण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत एमआयएम, सोबत जाणार नसल्याचं सांगितल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचा टोमणा मारला होता. तसंच शिवसेना मुस्लिम विरोधात नाही. जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत, समाजासाठी काम करणारे मुस्लिम आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही आहोत, असेही म्हटलं होतं.

Jaleel On Danve
MNS Vs Mahayuti: 'मुंबईत शिवसेनेचा एकमेव खासदार, तोही मनसेमुळेच...'; 'या' नेत्यानं वर्सोव्यात आणला मोठा ट्विस्ट

इम्तियाज जलील यांनी यावर शिवसेनेला डिवचलं. दानवे यांनी स्पष्ट सांगावे, "आम्ही कुठले देश विघातक कृत्य केलं आहे. देश विघातक कृत्य आपले नेते बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, म्हणून त्यांना 6 वर्ष मतदान बंदी घातली होती".आम्ही काही केले असेल, तर अडीच वर्ष आपली सत्ता होती. आमच्यावर का कारवाई केली नाही. पुरावे असेल, तर वेळ घालवू नका. आमच्यावर कारवाई करायला सांगा. घराजवळ पोलिस स्थानक आहे, तिथं जाऊन गुन्हा दाखल करा, असं आव्हान इम्तियाज जलील यांनी अंबादास दानवे यांना दिलं.

भाजपचा विषय ठरलेला, 'मुसलमान'

इम्तियाज जलील यांनी भाजप सत्तेसाठी देशात आणि राज्यात सत्तेसाठी करत असलेल्या राजकीय प्रयोगांवर देखील टीका केली. "भाजपने देशात काय काय प्रयोग केले आहे, ते देशाने पाहिले आहे. 'अब की बार 400 पार' झालं नाही, आता ते नवा प्रयोग करणार आहे, त्यांचे नेहमीचे विषय 'मुसलमान', 'दर्गा', 'लव जिहाद', असे असतात, म्हणून आता ते नवे मुद्दे काढत आहेत, अजून नवे मुद्दे काढतील ते, असेही ते म्हणाले". रावसाहेब सिलोडला पाकिस्तान म्हणाले होते, ते पाकिस्तानचे खासदार होते ते विसरले का? असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.

भावनिक मुद्यांचा खेळ

"गायीला राजमतेचा दर्जा दिला आहे. पण जग कुठे जातेय आणि आपण काय करतोय, भावनेचे मुद्दे काढून खेळ सुरू आहे, असे म्हणत 2019 ला लोकसभेत मराठी भाषेसाठी 'अभिजात'चा मुद्दा उपस्थित केला होता. मी मुद्दा उपस्थित केला होता आणि यांना इतके प्रेम होते, तर हा निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घ्यायला हवा होता. अखेरच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे लोक हुशार आहे. पण लोकांना हे कळते", असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com