"Villagers protest and enforce bandh over IPS Anjana Krishna case, raising tensions in Maharashtra politics." Sarkarnama
महाराष्ट्र

IPS Anjana Krishna Controversy : IPS अंजना कृष्णा प्रकरण चिघळले, गावकऱ्यांकडून कडकडीत बंद; धैर्यशील मोहिते पाटील टार्गेटवर...

Kurdu Villagers Call for Strict Bandh and Protest : कुर्डू गावातील नागरिकांना बीडशी तुलना करणे रुचलेले नाही. तसेच प्रशासनाकडून गावकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात आज कुर्डू गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरूम उत्खनन प्रकरण आयपीएस अंजना कृष्णा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हिडीओ संवादानंतर चिघळले असून गावकऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे.

  2. गावकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे, मुलभूत प्रश्न सोडवणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत; तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या ‘बीड’शी गावाच्या तुलनेवरही ग्रामस्थ नाराज आहेत.

  3. प्रशासनाच्या अहवालानुसार मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले असून मंत्री जयकुमार गोरे यांनीही गाव बंद करून प्रश्न सुटणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

Dhairyasheel Mohite Patil Faces Political Heat : सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरण अधिकच चिघळले आहे. आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुर्डू हे गाव संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. त्यानंतर आता गावकऱ्यांनीही एल्गार करत आज कडकडीत बंद पुकारला आहे.

आयपीएस अंजना कृष्णा यांना मुरूम उपसा करण्यास रोखू नये, यासाठी अजितदादांनी धमकी दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याप्रकरणी काही गावकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू गावाची तुलना बीडशी केली होती.

कुर्डू गावातील नागरिकांना बीडशी तुलना करणे रुचलेले नाही. तसेच प्रशासनाकडून गावकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात आज कुर्डू गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, गावातील मुलभूत प्रश्न सोडवावेत, आदी मागण्या गावकऱ्यांनी या बंदच्या माध्यमातून केल्या आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांनी मुरूम उत्खनन कायदेशीर असल्याचा दावा केला होता. मात्र, तहसीलदार संजय भोसले यांच्या अहवालामध्ये हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई योग्यच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ता. 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी मुरूम उपशाची चौकशी व पाहणीसाठी गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी कारवाईदरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांनीही मुरूम उपसा बेकायदेशीर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. गावात सुरू असलेल्या कामांची मुदत पूर्वीच संपली होती. तसेच उत्खननासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. याप्रकरणात काही लोकांना सहभाग असल्याने त्यांनी गावाला वेठीस धरू नये. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत, असेही गोरे यांनी स्पष्ट केले आहे.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: कुर्डू गावात बंद का पाळण्यात आला?
A: गावकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे आणि स्थानिक समस्या सोडवाव्यात यासाठी बंद पाळण्यात आला.

Q2: अंजना कृष्णा प्रकरणात नेमका वाद कशावरून निर्माण झाला?
A: मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने सांगितले, पण गावकऱ्यांनी ते कायदेशीर असल्याचा दावा केला; यावरून वाद उफाळला.

Q3: धैर्यशील मोहिते पाटील का टारगेटवर आले?
A: त्यांनी कुर्डू गावाची तुलना बीडशी केली, ज्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले.

Q4: प्रशासनाची भूमिका काय आहे?
A: तहसीलदारांच्या अहवालानुसार उत्खनन बेकायदेशीर आहे आणि गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT