Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण;11 तास झाडाझडती; काय सापडलं बंडू आंदेकरच्या घरात?

Ayush Komkar Case: बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हाती मोठे घबाड लागले आहे. मकोका कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच बंडू आंदेकर याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.
Bandu Andekar Ayush Komkar murder case
Bandu Andekar,Ayush Komkar murder Sarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरावर 11 तासांची झाडाझडती घेऊन मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, करारनामे व इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले.

  2. आयुष कोमकर खून प्रकरणात मकोका अंतर्गत बंडू आंदेकरसह आठ जणांवर कारवाई करण्यात आली असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

  3. आरोपींच्या घरातून सीसीटीव्ही, मोबाईल, पेनड्राईव्ह, दागिने, रोकड यासह महत्वाचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत.

वर्षभरापूर्वी नाना पेठेत झालेल्या वनराज आंदेकर खूनाचा बदला म्हणून या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर यांच्यावर आंदेकर टोळीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडून 'गेम' केला. या प्रकरणात पोलिसांना 13 जणांना अटक केली आहे, आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

बुधवारी या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तपासाची सूत्रे वेगानं फिरत आहे.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
KDMC Election 2025: भाजपशी वाढत्या मतभेदांमुळे शिवसेनेचा कस लागणार

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर यांच्यासह आठ जणांना मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे.

आयुष कोमकरच्या खून प्रकरणात मकोका कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यात मोठ्या प्रमाणात दस्ताऐवज सापडले आहेत पोलिसांनी ते जप्त केले आहे. आरोपी अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार (वाडेकर कुटुंबीय) यांच्या घराचीही तपासणी करण्यात आली.

Bandu Andekar Ayush Komkar murder case
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

पुणे गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुमारे 11 तास आंदेकर टोळीतील आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली. खबरदारी म्हणून आंदेकरने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची पोलिसांनी दिली.

काय सापडलं बंडू आंदेकरच्या घरात?

  1. ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (आजच्या बाजार भावानुसार ८५ लाखांहून अधिक किंमत)

  2. ३१ हजार रुपयांची चांदी

  3. २ लाख ४५ हजारांची रोकड

  4. १० पेक्षा अधिक साठेखत

  5. पॉवर ऑफ अॅटर्नी

  6. बँकेचे पासबुक

  7. एक कार

  8. विविध करारनामे

  9. टॅक्स पावत्या

  10. पेनड्राईव्ह

अन्य आरोपी

वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रोख, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली,

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष कोमकरच्या खुनाचा तपास सुरू आहे.

 FAQs

Q1: बंडू आंदेकरच्या घरावर छापा का टाकण्यात आला?
👉 आयुष कोमकर खून प्रकरणातील मकोका कारवाईनंतर तपासासाठी छापा टाकला.

Q2: पोलिसांना घरातून काय सापडले?
👉 ७७० ग्रॅम सोने, चांदी, रोकड, करारनामे, पासबुक, कार, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले.

Q3: या प्रकरणात किती आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे?
👉 बंडू आंदेकरसह 8 जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

Q4: या खून प्रकरणाचा तपास कोणाकडे आहे?
👉 सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com