Shivsena UBT-MNS: भाजपच्या फोडाफोडीला शिवसेना-मनसे युतीचा पहिला धक्का; उद्धव-राज ठाकरेंचे नेते आज एकत्र

Shiv Sena MNS Nashik Political Rally: महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेल्या फोडाफोडीला आज शिवसेना-मनसे युती पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि मनसे नाशिक शहराच्या प्रश्नावर आज महामोर्चा काढत आहे.
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 12 Sep : महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेल्या फोडाफोडीला आज शिवसेना-मनसे युती पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि मनसे नाशिक शहराच्या प्रश्नावर आज महामोर्चा काढत आहे. यामध्ये दोन्ही पक्षांच्या ताकदीची परीक्षा होईल.

नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी आणि महापालिकेच्या भ्रष्टाचारा विरोधात सातत्याने आवाज उठविला जात आहे. भाजपची जिल्ह्यात आणि राज्यात सत्ता आहे. या सत्तेचे केंद्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहे.

भाजपच्या महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून वादग्रस्त नेत्यांना संरक्षण देण्याच्या धोरणाला शिवसेना मनसे आज आव्हान देणार आहे. खासदार संजय राऊत, माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं शिवसेना आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप टार्गेट असेल.

नाशिक शहरातील कोयता गँग, वाहनांची तोडफोड, गेल्या सहा महिन्यात झालेले पस्तीस खून आणि महिलांवरील अत्याचार यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या सर्वच भागात गुंड आपली दहशत पसरविण्यासाठी नागरिकांना टार्गेट करत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यात सत्ताधारी भाजपला पूर्णता अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे.

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
OBC News : नाशिकमध्ये परप्रांतीयांना ओबीसींचे दाखले, उबाठा'च्या तक्रारीनंतर प्रशासन लागलं कामाला

या संदर्भात शिवसेना आणि मनसेचे नेते व कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. दिनकर पाटील, सलीम शेख, दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते, डि. जी. सूर्यवंशी प्रथमेश गीते गुरुवारी या मोर्चाच्या आढाव्याची माहिती दिली. या मोर्चात आमदार सचिन अहिर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, सिद्धेश शिंदे हे नेते नेतृत्व करतील.

नाशिक महापालिकेच्या कारभार आणि विशेषता भूसंपादनाच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. याबाबत शासनाने चौकशीचे आदेश देऊ नये कारवाई झाली नाही. शहरातील खड्डे आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातील गैरव्यवहार यावर शिवसेना, मनसे नेत्यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतला आहे.

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
Sonia Gandhi News : सोनिया गांधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न फसला; मतदारयादीबाबत कोर्टाने दिला मोठा दिलासा...

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि विशेषतः भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू केले आहे. त्यात शिवसेना ठाकरे पक्षासह विरोधकांना पोलीस आणि सत्तेचा भात दाखवून प्रवेश घडवले जात आहे.

त्या विरोधात राजकीय मनोबल वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर राज्यात होणारे हे पहिले शक्ती प्रदर्शन आहे. त्यामुळे नाशिकच्या या मोर्चाकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com