Mahayuti Goverment Sarkarnama
महाराष्ट्र

Islampur name change : इस्लामपूरचे नाव बदलणार; पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा: केंद्र सरकारकडे पाठवला प्रस्ताव

Islampur new name proposal News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव गेल्या अनेक दिवसापासून बदलण्याची मागणी केली जात होती.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती.

याबाबतची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधीमंडळात शुक्रवारी दिली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्लामपूरचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार आता ही शिफारस केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय हिंदुत्ववादी संघटना शिव प्रतिष्ठानच्या प्रस्तावानंतर घेण्यात आला आहे. शिव प्रतिष्ठानचे नेतृत्व संभाजीराजे भिडे करत असून, त्यांच्या समर्थकांनी इस्लामपूरचे नाव बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जाहीर केले होते.

इस्लामपूर येथील एका शिवसेना नेत्याने दिलेल्या माहितीनुसार नाव बदलण्याची मागणी १९८६ पासून सुरू आहे. त्यानुसार राज्यातील महायुती सरकारने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारनेही मंजूर केले. तर गेल्या वर्षी राज्य सरकारला यामध्ये मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या दोन शहरांची अधिकृत नाव बदलण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका एकत्रितपणे फेटाळली होती. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT