Devendra Fadnavis, Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागचे गुपित जयंत पाटलांनी सांगितले, 'मी...'

Jayant Patil reveals reason behind meeting Devendra Fadnavis : माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी मागचे कारण जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Roshan More

Jayant Patil News : माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेवर जयंत पाटील यांनी आपले मौन सोडले आहे.

पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, मी सर्व चर्चा माध्यमांमध्ये ऐकतो आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस भेट ही वेगळ्या कारणासाठी होती. ईश्वरपूरचे नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो.

ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील ईश्वरपूरचे नगराध्यक्ष सात हजारांनी निवडून आले. त्यांनी २२ वर्षापूर्वी त्यांच्या मामांनी काही बांधकाम केलं, त्याला गुंठेवारीने मान्यता मिळाले. ती जागा नगराध्यक्षांनी बक्षिसपत्राने घेतली. त्यांना कुठलीही नोटीस आली नाही. मात्र, याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली. आणि त्यांनी त्यांना आता अपात्र ठरवले.

माझ्या भागातील ही मोठी घटना आहे. विधानसभेचे अधिवेशने सुरू असताना झालं असतं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असतो. काल त्यांनी वेळ दिली होती. मात्र मला समजण्यास उशीर झाला, मी तेथे गेलो. मी हाॅलमध्ये थांबलो होतो नंतर ते आले. त्यांनी सांगितले की त्यांची मिटींग सुरू आहे. मी माझं गाऱ्हाणं सांगितलं. ते म्हणाले, मला माहिती नाही, मी लक्ष देतो. दोन दिवसात काय स्टेटस आहे ते सांगतो.

मी त्यांना स्टेटस सांगितले की ते अपात्र ठरले आहे. कालच आम्ही वकिलांकडे गेलो होतो. आता अपिल दाखल होईल. त्याआधी मी एकनाथ शिंदेसाहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण ते दिल्लीला गेले होते. त्यांच्यासोबत असणाऱ्यांचे फोन बंद होते. त्यामुळे या सगळ्यात मुख्यमंत्र्यांना भेटावे लागले. एक पाच दहा मिनिटे मी त्यांना भेटलो.

तटकरे-पटेलांची भेट नाही

जयंत पाटील हे वर्षावर गेले तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे देखील वर्षावर होते, अशी चर्चा होती. त्यांची भेट झाली का? याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, 'मला कोणाचाही भेट झाली नाही. हाॅलमध्ये एकटाच होतो. बराच वेळाने ते (मुख्यमंत्री) बाहेर आले. त्यांची कोणासोबत मिटींग सुरू होती याची मला माहिती नाही.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT