Devendra Fadnavis Jayant Patil Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मध्यरात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे आता विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काल मध्यरात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हे तिन्ही नेते एकत्रित फडणवीसांच्या भेटीला आल्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठं राजकारण शिजत असल्याचं बोललं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावर जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. सर्वात आधी सुनील तटकरे आणि पटेल वर्षावर दाखल झाले आणि त्यानंतर जयंत पाटीलही तिथे गेले. एका पाठोपाठ हे तिन्ही नेते वर्षावर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे काल जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षांच्या आमदारांची बैठक घेतल्याची बातमी समोर आली होती. या आमदारांचा एनडीएसोबत जाण्यासाठी दबाव असल्याचंही बोललं जात होतं. तर या आमदारांचं मत आपण शरद पवारांना सांगणार आणि त्यानंतर सर्वांना मोठ्या साहेबांचा निरोप काय आहे हे सर्वांना सांगेन, असं जयंत पाटील यांनी सांगितल्याची माहिती समोर आली होती.
अशातच आता जयंत पाटलांनी थेट अजितदादांच्या राष्ट्रवादींच्या नेत्यांसोबत ते वर्षावर फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी उलाढाल होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे माजी आमदार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. "रात्रीच्या वेळी अशी काही घडामोड होत असेल हे ते कल्पनेच्या पलीकडच आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते तिथे जात असतील तर आम्ही समजू शकतो की, अर्थखात्याच्या मागणीसाठी इतक्या रात्री ते गेले असतील, पण तिथे जयंत पाटीलसाहेब गेले आहेत म्हणजे हा आणखी एक नवीन ट्विस्ट आहे राजकारणामध्ये", असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.