Maharashtra Politics : जयंत पाटील अन् CM फडणवीसांच्या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली समोर

Jayant Patil Meet Devendra Fadnavis : "वर्षा बंगल्यावर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात. भारतीय जनता पार्टी या पक्षासोबत आमचे मतभेद आहेत आणि ते कायम राहतील. पण त्या पक्षाचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटायला महाविकास आघाडीचे नेते गेले आहेत का? की अजून काही कारण आहे."
Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar :
Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar :sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 15 Jul : राज्याच्या राजकारणात काल मध्यरात्री एक मोठी घडामोड घडली. ती म्हणजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तीन नेत्यांनी अचानक 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीवरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ही भेट नेमकी कशा संदर्भात झाली? शरद पवारांची राष्ट्रवादीत सत्तेत सहभागी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याच सर्व घडामोडी सुरू असताना आता यावर ठाकरेंच्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे आणि पटेल यांच्या पाठोपाठ जयंत पाटलांनी वर्षावर जाऊन फडणवीसांची फेट घेतली. यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, "या भेटी संदर्भात मला आता काहीही मत मांडता येणार नाही. कारण जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत.

Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar :
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! मध्यरात्री जयंत पाटील CM फडणवीसांच्या भेटीला; तटकरे-पटेलांचीही हजेरी...

तर वर्षा बंगल्यावर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात. भारतीय जनता पार्टी या पक्षासोबत आमचे मतभेद आहेत आणि ते कायम राहतील. पण त्या पक्षाचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटायला महाविकास आघाडीचे नेते गेले आहेत का? की अजून काही कारण आहे. यावर मी आत्ता काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही," अशी सावध प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली आहे.

Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar :
Hormuz Strait Attack : अमेरिका-इराण संघर्षात पुण्यातील कुटुंब उद्ध्वस्त; जहाजावरील हल्ल्यात मर्चंट नेव्ही अभियंत्याचा मृत्यू

एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने सावध प्रतिक्रिया दिली असली तरी दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार अमोल मिटकरी यांनी या भेटीवर थेट भाष्य केलं आहे. जर जयंत पाटील वर्षा बंगल्यावर गेले असतील तर नक्कीच राजकारणात काहीतरी ट्विस्ट आहे. शिवाय पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक आमदार खासदार एनडीएसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com