Jitendra Awhad, Rupali Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Patil FIR : आता होईल 'दूध का दूध और पानी का पानी'! गुन्हा दाखल होताच रुपाली पाटील काय म्हणाल्या?

Jitendra Awhad chat controversy WhatsApp Chat Beed Police : रुपाली पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.

Rajanand More

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतचे एक व्हॉट्सअप चॅटिंग सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी त्यांची तक्रार देण्यात आली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी आपण शंभर टक्के तपासाहा सहकार्य करू, असे म्हटले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांचेही भाषण झाले. यावरून रुपाली पाटील यांनी आव्हाड यांच्याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट केली होती.

रुपाली पाटील यांनी सोशल मीडियात आव्हाडांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट असल्याचा दाव करत एक पोस्ट केली होती. 'उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चाकडे. मुंड्या विरोधात आणि वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळ पासून प्रयत्न करतोय.', असा उल्लेख होता.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरून हे स्क्रीनशॉट खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांनंतर शनिवारीच आव्हाडांच्या पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी बीड पोलिसांत रुपाली पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रुपाली पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, येस भेटूया. बीड मधील खोट्या FIRच्या तपासात माझे 100 % सहकार्य असणार की. खोट्या FIR केल्याबद्दल धन्यवाद जितेंद्र भाऊ आव्हाड. आता होईल दूध का दूध और पानी का पानी.

आता विरोधकांनी विनाकारण ओरडू नये. सरकार तक्रार घेत नाही, दबाव आणतात म्हणून. तुमची खोटी तक्रार घेतली बरं का? महायुतीचे सरकार लोकशाही, कायद्याने चालवणारे सरकार आहे, शिक्कामोर्तब झाले. खोट्या FIR चा लढाईसाठी मी तयार आहे, असे पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT