Santosh Deshmukh Murder Case : 'तो' मोठा नेता कोण? नाव जाहीर करा; अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातील मोबाईलवरून अंजली दमानिया आक्रमक

Anjali Damania Big Leader mobile phone found vehicle killing of Santosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातून पोलिसांना सापडलेल्या मोबाईलबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा दावा.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात दोन मोबाईल सापडले असून, त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.

याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमुळे बीडच्या राजकारणाला घेरलेल्या गुन्हेगारी जगतात, खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांच्या समाज खात्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन? तात्काळ नाव जाहीर करा, अशी मागणी करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Anjali Damania : सुरवात बीडमधून... धनंजय मुंडेंपासून..; अंजली दमानियांच्या 'सत्य'शोधक भूमिकेने राजकारण्यांचे धाबे दणाणले

"'सीआयडी'ला स्कॉर्पिओ गाडीमधे दोन मोबाईल मिळालेत, त्याचा डाटा रिकव्हर करण्यात येत आहे, त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आहेत. याशिवाय एका बड्या नेत्याला फ़ोन गेला हे देखील आहे. कोण आहे हा बडा नेता? तात्काळ नाव जाहीर करा", अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
TOP Ten News : 'जय-वीरू' एकच..., माळी-धस यांच्या वादात पाटलांची मध्यस्थी -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

बीडमधील (BEED) संतोष देशमुख हत्याप्रकरणाला आता 19 दिवस झाले आहेत. हत्येच्या निषेधार्थ आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा, यासाठी काल बीडमध्ये मोर्चा निघाला होता. बीड, एकंदर राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीवर अंजली दमानिया आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या हत्येच्या तपास होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येत सीआयडीला मोबाईल सापडल्यावर आणि त्यातून एका बड्या नेत्याला फोन केल्याचा दाव्यावर अंजली दमानिया अधिकच आक्रमक झाल्या आहेत. या नेत्याचे नाव जाहीर करण्याची मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हत्येच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले वाहन

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्येपूर्वी त्यांच्या अपहरणासाठी काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जप्त केले होते. याच वाहनात सीआयडीच्या अधिकाऱ्यांना दोन मोबाईल आढळले आहे. या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचा दावा होत आहे. तसेच याच मोबाईलवरून एका नेत्याला फोन देखील गेल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. पेरंतु याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांनी अजून तरी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मागील चार दिवसांपासून सीआयडीचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com