
Mumbai, 29 December : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते, त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यात आता भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आमदार धस यांचे कान टोचताना ‘या लढाईत प्राजक्ता तू एकटी नाही, हा विश्वास देते,’ असा शब्दही वाघांनी माळीला दिला आहे.
आमदार चित्रा वाघ यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्त्रीचा सन्मान याला भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिलेले आहे, त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी आमदार सुरेश धस यांची कानउघडणी केली आहे.
त्यात वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे…या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते, या शब्दांत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुरेश धस-प्राजक्ता माळी वादात स्वपक्षातील आमदाराला खडे बोल सुनावताना प्राजक्ताला पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्राजक्ता माळी हिने शनिवारी प्रेस कॉन्फरन्स घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहन केले होते. त्यांनी जर आपली माफी मागितली नाही तर आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते.
सुरेश धस यांनी आपण प्राजक्ता माळी हिच्याविषयी काहीही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे मी प्रजाक्ता माळी हिची आपण माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. उलट बीड जिल्ह्यातील कोणाबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत, त्यांनीच प्राजक्ता माळी हिला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली नाही ना, असा आरोपही केला होता. त्यात आता चित्रा वाघ यांनी उडी घेत प्राजक्ता माळीची बाजू घेऊन धस यांना इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.