Kangana Ranaut Sarkarnama
महाराष्ट्र

Kangana Ranaut News : कंगना रनौत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यावर का संतापली ? म्हणाली, मी स्वाभिमानी हिंदू !

Chaitanya Machale

Maharashtra Political News : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय जनता पक्षाने कंगनाला लोकसभेची उमेदवारी दिली आहे.काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी गडचिरोली येथे झालेल्या एका सभेत कंगनावर टीका करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कंगना बीफ खाते असा उल्लेख करत काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला आता भाजपने (BJP) उमेदवारी दिलेल्या कंगना देखील उत्तर दिले आहे. आपल्या एक्स वर कंगनाने ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी गोमांस किंवा कोणत्याही प्रकारचे केड मीट खात नाही. माझ्याबद्दल अशा निराधार अफवा पसरवल्या जात आहेत. मी एक अभिमानी हिंदु आहे, असे उत्तर तिने दिले आहे. त्यामुळे सध्या विजय वडेट्टीवार विरुद्ध कंगना असा वाद पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजप समर्थक अशी कंगनाची ख्याती असून यापूर्वी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेमुळे तर कधी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील वक्तव्यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. तीच्या या बेजबाबदारपणाच्या वक्तव्यामुळे अनेकदा कंगनाला नेटकऱ्यांच्या टीकेला देखील सामोरे जावं लागलं आहे.

आता तिने काँग्रेस (Congress) नेते वडेट्टीवर यांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे. गोमांस खाणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तिकीट दिलं आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

आपल्या ट्वीट मध्ये कंगनाने काय म्हंटलं..

मी गोमांस किंवा कोणत्याही प्रकारचे केड मीट खात नाही. माझ्याबद्दल अशा चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. ही अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद गोष्ट आहे. मी अनेक दशकांपासून योगा आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार करत आहे. आता अशा डावपेचांनी माझी प्रतिमा खराब करू शकणार नाहीत. माझे लोक मला ओळखतात. त्यांना माहित आहे मी कशी आहे. आणि मी एक अभिमानी हिंदु आहे. त्यामुळे कोणीही त्यांची दिशाभूल करु शकत नाही.जय श्री राम. असे कंगना रणौत आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

Kangana Ranaut

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT