Anand Paranjpe On Jitendra Awhad : 'राष्ट्रवादी'मधील सूर्याजी पिसाळ जितेंद्र आव्हाडच, आनंद परांजपेंचा हल्लाबोल

NCP NEWS : अजितदादा व सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचे घरातील संबंधांवर , भाऊ बहिणीच्या संबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमचे तुमच्या बहिणीशी संबंध कसे आहेत ?
Anand Paranjpe Jitendra Awhad
Anand Paranjpe Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल , छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविली. राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ, खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बहिण भावाच्या नात्यावर आव्हाडांनी बोलू नये, असा सल्ला देखील परांजपे यांनी दिला.

Anand Paranjpe Jitendra Awhad
BJP Politics : आयारामांना पायघड्या अन् निष्ठावंतांना 'गाजर'; मोहोळच्या क्षीरसागर बंधूंबाबत भाजपचं जरा चुकलंच

वर्ष 2014, 2016, 2019 आणि 2022 मध्ये काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवार यांना विचारायची हिंमत दाखवावी.आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशाप्रकारची घोषणा खुद्द खडसे यांनी केली आहे. त्यांना आव्हाड यांनी जावून विचारावे की साहेबांनी आपल्याला काय कमी केले होते?, असा टोला परांजपेंनी आव्हाड (Jitendra Awhad ) यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई आणि कळवा येथे आयोजित केलेल्या संस्कृतिक कार्यक्रमात अजित पवार, सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर टीका केली होती. पालखी नाचविण्याचा त्या सांस्कृतिक व्यासपीठावरून बोलताना पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले शरद पवार यांना सोडून एकनाथ खडसे का जातायेत याचा विचार करावा, असे प्रत्युत्तर परांजपे यांनी आव्हाड यांना दिले.

नातेसंबंधांवर आव्हाड यांनी बोलू नये

अजितदादा व सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचे घरातील संबंधांवर , भाऊ बहिणीच्या संबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमचे तुमच्या बहिणीशी संबंध कसे आहेत ? हे त्यांनी स्वतः देखील तपासून घ्यावेत. कौटुंबीक नातेसंबंधांवर आव्हाड यांनी बोलू नये, असा सल्ला आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला.

(Edited By Roshan More)

Anand Paranjpe Jitendra Awhad
Rohit Pawar News : '... म्हणून अजितदादा तुम्ही भाजपसोबत गेले आहात का ?'; रोहित पवारांचा खोचक सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com