Loksaha Election 2024 :अशोक नेते, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (सोमवारी) चंद्रपूरमध्ये आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. अशोक नेते ashok nete , सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्यासोबतच सभेला आलेल्या लोकांना पंतप्रधान मोदींनी एक काम सांगितले. हे काम सुधीर मुनगंटीवार यांचे नाही, हे काम अशोक नेते यांचे नाही हे काम मोदींचे आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी सभेतील लोकांना केले.
'सभेला आलेल्यांनी परत गेल्यानंतर घरोघरी जावे. लोकांना सांगवे की नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे चंद्रपूरला आले होते. त्यांनी तुम्हाला प्रणाम केला आहे.', हे माझे काम आहे. ते तुम्ही करणार ना, असा सवालदेखील पंतप्रधान मोदींनी सभेला जमलेल्या जनसमुदायाला केला. लोकांनी 'हो' म्हणत मोदींना प्रतिसाद दिला.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते, चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना विजयी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यासाठी त्यांनी खास टास्क सांगितला. मोदी म्हणाले, मुनगंटीवार, नेते यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक पोलिंग बूथ जिंकायचे आहे. जास्तीत जास्त मतदान घडवून आणायचे आहे. उन्हाचा विचार करू नका, सकाळी जास्तीत जास्त मतदान घडवून आणा, हे सुधीर मुनगंटीवारांचे काम नाही. मोदींचे काम आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरेंवर नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आपल्या सोबत आहे. नकली शिवसेना असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. नकली शिवसेनावाल्यांनी सनानत धर्माला शिव्या देणाऱ्या डीएमके पक्षाच्या नेत्याला मुंबईत बोलवून रॅली केली, असा टोलादेखील मोदींनी लगावला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.