Karnataka Manjula Nagimukhar  Sarkarnama
महाराष्ट्र

PM Modi women safety appeal : मंजुळा निघाली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, कशासाठी?

Karnataka Manjula Nagimukhar Delhi women safety Prime Minister Narendra Modi : देशातील महिला, तरुणी, बालिकांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटकमधील मंजुळा नागिमुखर दिल्लीकडे पायी निघल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधत आहेत.

Pradeep Pendhare

Manjula Nagimukhar march : दिल्लीतील निर्भया प्रकरणानं देश ढवळून निघाला. कर्नाटकमधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या अत्याचाराचे प्रकरण देशात गाजले. मुंबई बेलापूरमधील शाळेतील मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरणानं महाराष्ट्रात संताप होता. आजही देशात महिला, मुली, बालिकांवर कोणाच्या ना कोणाच्या अत्याचाराच्या बळी ठरत आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, निर्भया घडूच नये, असे कडक कायदे करण्याची मागणी करत कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील बडोनी (ता. लिंगासुगूर) गावतील मंजुळा नागिमुखर पायी दिल्लीकडे निघाल्या आहेत. कर्नाटकच्या रायचूर ते दिल्ली या पदयात्रेतून महिलांच्या सुरक्षितेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे लक्ष वेधणार असल्याचे निर्धार मंजुळा यांनी केला आहे.

कर्नाटक राज्यातील मंजुळा या दिल्लीच्या (Delhi) दिशेने पायी निघाल्या असता, अहिल्यानगर शहरात दाखल झाल्या होत्या. त्यांचा पद यात्रेचा काल 14 वा दिवस होता. मंजुळा नागिमुखर या कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील बेडोनी (ता. लिंगासुगूर) गावातील रहिवासी आहेत. शिक्षणही जेमतेम असून, घरी दोन मुली असतात. त्यांनी बेडोनी गावातून दिल्ली येथे जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केला.

गावातून त्या एकट्याच निघाल्या. पाठीवर एक पिशवी आणि हातात एक फलक. दररोज 35 ते 40 किलोमीटर त्या चालतात. गावातील मंदिरात मुक्कामासाठी थांबतात. कोणी विचारपूस केली, तर यात्रेविषयी सांगतात. मात्र, जेवण, चहापाणी तसेच पैशाची मदत नाकारतात. दुसऱ्या दिवशी पुढील प्रवासाला सुरुवात करतात.

25 मार्च रोजी त्यांनी यात्रेला सुरुवात केली. अहिल्यानगरमधील पायी यात्रेचा 14 वा दिवस होता. पुढे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश राज्यातून दिल्ली गाठणार आहेत. तब्बल 400 ते 500 किलोमीटर प्रवासासाठी दोन महिने चालण्याचा संकल्प केला आहे. महिला आणि भ्रष्टाचाराच्या लढ्यासाठी आपलेही योगदान असावे, असे त्या सांगतात.

महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. यासाठी सरकारने कठोर कायदा करण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागणीचे पत्र देणार आहे. महिलेला हात लावण्याची हिंमत कोणाचीही होता कामा नये, असा कायदा करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार असल्याचे मंजुळा यांनी विश्वासानं सांगितले.

मंजुळा दिल्लीसाठी एकट्याचा निघाल्या आहेत. त्या कन्नड भाषा बोलतात, तसेच हिंदी तोडकीमोडकी बोलतात. त्यामुळे त्यांना प्रवासात संवाद साधताना अडचण येते. त्यामुळे पुढील प्रवासात प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही मंजुळा यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT