BJP Vs Congress News : काँग्रेसला भाजपकडून धक्का; मलकापूरचे चांदे काका- पुतणे BJPमध्ये दाखल!

Chande joins BJP : चांदे काका-पुतण्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, कऱ्हाड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले.
Chande joins BJP
Chande joins BJP sarkarnama
Published on
Updated on

Malkapur Politics News : कऱ्हाड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे. कारण, मलकापूर येथील काँग्रेसचे माजी दोन नगरसेवक चुलते आणि पुतण्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चांदे चुलत्या- पुतण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा त्यांना धक्का मानला जात आहे.

मलकापूर पालिकेचे माजी बांधकाम सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे व त्यांचे पुतणे माजी नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदे, धनाजी देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत प्रदेश कार्यालयात आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्वात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Chande joins BJP
Crorepati farmer : केवळ 'हे' एक झाड यवतमाळच्या एका शेतकऱ्यास बनवणार आहे लवकरच कोट्यधीश!

प्रशांत चांदे हे पालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. शहर काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे पालिकेत तब्बल १५ वर्षे नगरसेवकपदी राहिले आहेत. त्यापैकी १० वर्षे ते बांधकाम सभापती, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले. पालिका होण्यापूर्वी १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. चांदे कुटुंबीयांचा भाजप प्रवेश माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे एकेक नेते पक्ष सोडून चालल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांच्या वर्चस्वालाही शह दिल्याचे मानले जात आहे. यावरून काँग्रेसला दक्षिणेत धक्के बसू लागल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे पारडे भक्कम होत असल्याचे दिसून येते.

Chande joins BJP
Abu Azmi on Khulatabad renaming : ''...तर मी म्हणतो एका जागेचंच नाही संपूर्ण देशाचं नाव बदला, आम्ही स्वागत करू'' ; अबू आझमींचं मोठं विधान!

याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अतुल सावे, आमदार डॉ. भोसले, समाधान अवताडे यांनी त्यांचे स्वागत केले.

‘‘आमदार भोसले हे एक कर्तव्यदक्ष आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना २० वर्षांत काहीही विकास करता आला नाही; पण आमदार भोसले यांनी कामाचा धडाका पाहता ते या पाच वर्षांतच विकासाचा अनुशेष भरून काढतील. या कर्तव्य तत्परतेमुळेच अतुल भोसलेंचे नेतृत्व स्वीकारून दक्षिणमधील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.'' असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com