Karuna Munde & CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Karuna Munde : करुणा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार? नेमकं कारण काय?

Karuna Munde On CM Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसापासून बीडसह राज्याचे राजकीय तापमान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून तापलेलं आहे. यामुळे तेथील एसपी बदलण्यात आले आहेत.

Aslam Shanedivan

Pune News : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून राज्याचे तापमान चांगलेच तापले आहे. याच प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी देखील सोशल मीडियाद्वारे मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. तर वाल्मिक कराडने आपल्याला धनंजय मुंडे यांच्यासमोर धक्काबूक्की केली होती असा दावा केला होता. यामुळेच मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली. यादरम्यान वांद्रे फॅमिली कोर्टाने मुंडे यांना झटका दिला होता. यानंतरही करुणा मुंडे यांनी मुंडेंवर अनेक आरोप केले होते. या प्रकरणानंतर करूणा मुंडे चर्चेत आल्या असतानाच त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ज्यामुळे राज्यात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बीड प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदर हल्लाबोल करताना येथील राखेतील गुन्हेगारी उघड केली होती. तसेच सरपंच संतोष देशमुख्य यांच्या हत्येत वाल्मिक कराडच आका असून याच्यावर कोण आका आहे त्यांचा शोध घ्या अशी मागणी सरकारकडे केली होती. तर या प्रकरणात पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा दावा देखील केला होता. यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक बदल केले होते. ज्यात एसआटी पथकात आधी काही बदल आणि नंतर ती रद्दच करण्यात आली. तर तत्कालिन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती. त्यांच्या जागी नवनीत कॉवत यांची नियुक्ती केली.

याच नियुक्तीनंतर करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत. परळीत पाठवलेले नवीन एसपी चांगलं काम करत असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मी फडणवीस यांना लवकरच भेटणार असून फडणवीस साहेब यांचे खूप-खूप आभारी आहे. आज परळी, बीडमध्ये त्यांनी चांगले एसपी पाठवले असून त्यांचे काम खूप चांगले सुरू आहे.

नवनीत कॉवत सध्या परळीत गुंडांना उचलून जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहेत. त्याच्यासाठी मी फडणवीस साहेबांचे खूप-खूप आभार मानते. फडणवीस साहेब मी तुम्हाला लवकरच पुराव्यांसह भेटणार असून एक बहिण म्हणून मला न्याय द्या, असेही आवाहन करुणा मुंडे यांनी केलं आहे.

गेल्याच आठवड्यात वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निर्णय देताना, धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले होते. तसेच करुणा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी असून पोटगीपोटी महिन्याला 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर करुण शर्मा यांनी आपणच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे अनेकदा म्हटल्याचे सांगितले होते. तर याच हक्कासाठी मागच्या काही वर्षापासून कायदेशीर लढाई लढत असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT