Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले, 'दावोस'मध्ये 98 टक्के परकीय गुंतवणूक...

CM Devendra Fadnavis On Dawos Investment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून काय साधलं,यावरही रोखठोक विधान केलं. ते म्हणाले,सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,दावोसमधील या करारांमधून आपण काय साधलं.तर जगामध्ये महाराष्ट्राचा बोलबाला पोहचला.
Devendra Fadnavis On Davos .jpg
Devendra Fadnavis On Davos .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसचा दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रात पंधरा लाखांहून अधिक कोटींची गुंतवणुक असल्याचा दावा केला होता.तर दुसरीकडे या फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती.पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोस दौऱ्यातील गुंतवणुकीवरुन सर्वात मोठा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (ता.12) 'सकाळ सन्मान' सोहळ्याला उपस्थित होते.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर दावोसमधील गुंतवणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, आपण दावोसमध्ये यावेळी ज्याप्रकारे करार केले, तो दावोसच्या इतिहासातलाही एक रेकॉर्ड आहे. यावेळी आपण एकूण 15 लाख 70 हजार कोटींचे करार केले. काही लोकांनी यावर टीकाही केली की, तुम्ही दावोसमध्ये (Dawos) भारतीय कंपन्यांसोबत करार केले,रिलायन्स,जेएसडब्ल्यू,अशा कंपन्यासोबत जे केले. ते इथेही करु शकलो असतो ती अशी टीकाही केली जाते.पण मी तुम्हांला सांगू इच्छितो की, दावोसमध्ये जे करार झाले त्यात 98 टक्के परकीय गुंतवणूक आहे,असंही फडणवीसांनी सांगितले.

दावोसही गुंतवणुकीची आंतरराष्ट्रीय पंचायत आहे.ज्यामध्ये जगामधले वेगवेगळ्या व्यवसायातले लोक तिथं एकत्र येतात.त्यामध्ये बिझनेस ट्रॅन्जेक्शन होतात.जग कुठं चाललंय,जगातला बिझनेस कसा सुरू आहे, जगातली आर्थिक परिस्थिती कशी सुरू आहे.नवीन आव्हानं कोणती आहे,अशा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा तिथं होती,असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis On Davos .jpg
Congress Politics : राहुल गांधींचा महाराष्ट्र काँग्रेसला 'दे धक्का', प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, अमित देशमुखानंतर 'हे' नाव चर्चेत, ओबीसी-मराठा वादावर काढले उत्तर?

मुख्यमंत्री म्हणाले,तसेच आपल्याही ज्या कंपन्या असतात त्यांचीही इच्छा अशी असते की,दावोसमध्ये जाऊन करार करावेत .कारण त्यांचेही परदेशी भागीदार तिथं उपस्थित असतात.तसेच जगभरातले प्रसिध्द फायनान्शिअल इन्स्टिटयूटचे प्रमुख तिथं आलेले असतात.म्हणून असे करार शक्यतो दावोसमध्ये जाऊन करण्यावर कंपन्यांचा भर असतो.

याचवेळी त्यांनी दावोसमधील गुंतवणुकीत फार मोठं यश आपल्याला मिळालं.खूप चांगले करार करण्यात आल्याचंही नमूद केलं. यावेळी फडणवीस म्हणाले,विविध क्षेत्रांत आपण गुंतवणूक करू शकलो.अनेक परदेशी कंपन्यांशी आमची चर्चा झाली.जे करार तिथे झाले नाहीत,ते आता भारतात केले जात आहे.किंवा त्या कंपन्या भारतात येणार असून त्यानंतर या कंपन्यांसोबत करार केले जाणार आहे.

Devendra Fadnavis On Davos .jpg
Mohol Politics: मोहोळचं राजकारण तापलं; राजन पाटलांच्या पुत्राचा उमेश पाटलांवर जिव्हारी लागणारा वार; म्हणाले,'बूट चाटून...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून काय साधलं,यावरही रोखठोक विधान केलं.ते म्हणाले,सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,दावोसमधील या करारांमधून आपण काय साधलं.तर जगामध्ये महाराष्ट्राचा बोलबाला पोहचला.कारण दावोस हे अशी जागा आहे,जिथं जग असतं,आणि एकमेकांवर नजर ठेवून असतं.त्यामुळे महाराष्ट्राचा बोलबाला जगात पोहचला.

दावोसमध्ये जे लोकं होती,त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील की, तिथं अशी एक चर्चा होती,हे असं कुठलं राज्य आहे, ज्या राज्याच्या पॅव्हेलियन बाहेर करार करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.एकदिवस तर असा होता,आम्ही 12 तास करार करत होतो. मला असं वाटतं की, सेंटरला स्टेजवर आपण महाराष्ट्राला आणू शकलो असं मतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com