Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदेंना गुड न्यूज, 'त्या' योजनांबाबत सत्य काय ते सांगून टाकलं

CM Devendra Fadnavis Teerthdarshan Yojana Shiv Bhojan : राज्याच्या आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही योजना बंद करणार असल्याची चर्चा होती.
 Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : राज्याच्या आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही योजना बंद करणार असल्याची चर्चा होती. विशेषता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आर्थिक लाभ देणाऱ्या सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना बंद होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे तीर्थदर्शन योजना' आणि 'शिवभोजन थाळी' बंद होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'सकाळ सन्मान सोहळ्यात' 'सकाळ'चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शिवभोजन थाळी आणि तीर्थदर्शन योजना बंद होणार का? या विषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असते ते म्हणाले, मी अशा बातम्या ऐकतो आहे की योजना बंद होणार आहे. मात्र, तसे काही नाही. या योजना बंद होणार नाही. तीर्थ दर्शनासाठी नुकतीच बस गेली. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
CM Fadnavis on Ladki Bahin Yojana : अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडील सरकारच्या पैशाचे आता काय होणार? ; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केलं, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणी योजनेमुळे आर्थिक ताण येत नसल्याचे देखील स्पष्ट केले. तसेच अपात्र लाडक्या बहि‍णींची संख्या 12 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली. ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून परत पैसे घेणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

छगन कमळ बघ...

देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीमध्ये पहिलेचे पुस्तक देत त्यांना लहानपणीच्या आठवणी विषयी विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी पहिलीच्या पुस्तकात काय नवीन आहे, हे बघावं लागेल. यात 'छगन कमळ बघ' हे आहे ना? त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या या विधानाचा रोख छगन भुजबळ यांच्याकडे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

 Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले, 'दावोस'मध्ये 98 टक्के परकीय गुंतवणूक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com