rahul gandhi priyanka gandhi Nitesh Rane  sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : नितेश राणेंना काँग्रेस नेत्याकडून करारा जवाब; म्हणाले, '...तर केंद्र सरकार'

Vijay Wadettiwar Criticized Nitesh Rane : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या केरळ हा मिनी पाकिस्तान असल्यानेच तेथून निवडून येतात, असा दावा नितेश राणे यांनी केला.

Roshan More

Vijay Wadettiwar News : मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याला पाकिस्तान म्हटले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या केरळ हा मिनी पाकिस्तान असल्यानेच तेथून निवडून येतात, असा दावा नितेश राणे यांनी केला. राणे यांनी केलेल्या या वक्तव्याला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी करारा जवाब दिला आहे.

'केरळ सारख्या भारतातील एका प्रगत राज्याला मिनी पाकिस्तान बोलणे हे कितपत योग्य आहे ? महायुतीचे मंत्री ज्या पदावर बसले आहेत, त्या पदाचा सन्मान राखायला शिकायला हवे. ही भाषा केवळ एका राज्याचा अपमान नसून भारताच्या एकात्मतेवरही हल्ला आहे.', असे ट्विट करत वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांचा समाचार घेतला आहे.

'महायुतीच्या नेत्यांकडून वेळोवेळी अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली जातात, जी समाजात द्वेष निर्माण करतात. जर केरळ “पाकिस्तान” असेल, तर केंद्र सरकार काय करत आहे? राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अतिरेकी मतदान करतात अशी मुक्ताफळे भाजपचे मंत्री उधळत आहे, हा मतदारांचा अपमान नाही का?' असा प्रश्न आपल्या ट्विटमधून वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

महायुतीने पात्रता सिद्ध केली

गुंडगिरी आणि प्रक्षोभक भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांनाच आम्ही मंत्री बनवू या पात्रतेवर महायुतीचे राज्यात मंत्रिमंडळ बनले आहे. त्यामुळे वेळोवेळी असे वक्तव्य करून आपली पात्रता सिद्ध करण्याची स्पर्धा महायुतीत लागलेली दिसत आहे. पात्रता सिद्ध करण्याच्या शर्यतीत आपली बुद्धी गमावलेल्या महायुतीच्या मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील जनतेने कसली अपेक्षा न करणे योग्य!, असा टोलाही वडेट्टीवार यांनी महायुतीला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT