Devendra Fadnavis : बीडचा 'हा' बडा नेता सीएम फडणवीसांच्या भेटीला; राजकीय फासे पलटणार

CM Fadnavis Meeting News : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी व विरोधकाकडून या प्रकरणातून एकमेकावर टीका केली जात असल्याने वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्येही राजकीय दुफळी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. यातच बीड जिल्ह्यातील माजी मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. बीड विधनसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.

Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : मंत्री आठवलेंना अंजली दमानियांनी ऐकविला 'व्हॉईस मेसेज'; 'मोठी' मागणी करताना व्यक्त केली 'ही' भीती, पण...

निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांनी दोन पुतण्यापैकी महायुतीचे उमेदवार असलेले पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी लगेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निवडणुका लढविणार असल्याचे म्हटले होते.

Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जात होता', आमदाराच्या दाव्याने खळबळ

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपासून अंतरावर असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आता अचानक मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे आता या भेटीचे राजकीय क्षेत्रातील मंडळी वेगवेगळे अर्थ काढत आहेत.

Devendra Fadnavis
Suresh Dhas : बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुरेश धस यांनी केली 'हे' मोठे विधान; म्हणाले,....

मुंबईत बऱ्याच दिवसानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामुळे यावेळी दोघामध्ये काय चर्चा झाली याची चर्चा शिगेला पोहचली आहे.

Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यासह पदाधिकाऱ्यांची सीआयडीकडून आठ तास चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com