Aaditya Thackeray Disha Salian sarkarnama
महाराष्ट्र

Aditya thackeray 'आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते', पक्षातील माजी नेत्याने केला खळबळजनक दावा

Kishore Tiwari Claim Will Aaditya Thackeray Be Arrested : किशोरी तिवारी यांची नुकतीच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर तिवारी यांनी दिशा सलियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Roshan More

Aaditya Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. विशेष म्हणजे मोदींची मर्जी असे पर्यंतच ते बाहेर आहेत, असे देखील तिवारी म्हणाले आहेत. किशोरी तिवारी यांची नुकतीच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

किशोर तिवारी म्हणाले, तुम्ही (आदित्य ठाकरे) मंत्री होता. तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना दिशा सालियानच्या घरी पार्टी अटेंड करण्यासाठी गेला होता. त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली. मी नसतो तर यांना (आदित्य ठाकरे) अटक केली असती. मी मीडियावर दाखवून दिलं की भाजपचे कटकारस्थान चालू देणार नाही.

'आदित्य ठाकरेंना आजही अटक होऊ शकते. नरेंद्र मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी त्यांना अटक होईल. भ्रष्टाचार काढून मोकळं करतील ते. पदावर असताना तुम्ही भ्रष्टाचार केला असेल तर नवीन सत्तेवर आलेल्यांना तीच नोकरशाही केलेला भ्रष्टाचार मांडते. महाराष्ट्रात भ्रष्ट नोकरशाहीने कळस काढला आहेआणि राजनेते तर राजधर्म विकून बसले आहेत.', असा दावा देखील किशोर तिवारी यांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

तिवारी सगळ्यात मोठा गुन्हेगार

तिवारी बोलण्यात कुठलीच संगती नाही. ते जर म्हणत असतील आदित्य ठाकरेंना मी वाचवले तर सगळे मोठे गुन्हेगार तेच आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र, भाजपनेच हे केलेल कटकारस्थान असल्याचेच तिवारी सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साम टिव्हीशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT