Disha Salian Death Case Update : दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट; राणेंची चौकशी होणार, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार

Nitesh Rane Vs Aaditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांची आता बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे.
Nitesh Rane - Disha Salian
Nitesh Rane - Disha Salian Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दिशा सालियन प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली होती.या प्रकरणावरुन तत्कालीन विरोधीपक्ष असलेल्या भाजपने रान उठवत ठाकरे सरकारची पुरती कोंडी केली होती.

ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून या प्रकरणाचा संदर्भ घेतला जातो. आजही विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणांवरुन आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर शा‍ब्दिक हल्ले चढवत प्रश्नांची सरबत्ती केली. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट येत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांची आता बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून राणे यांची चौकशी होणार आहे.त्यामुळे आता माजी मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Death Case) मुंबई पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा राणे यांनी दिशा सालियन प्रकरणी आपल्याकडे महत्त्वाचे आणि धक्कादायक पुरावे असल्याचे दावे केले होते.त्यामुळे एसआयटीकडून करण्यात येणार्या चौकशीत आता नितेश राणे काय माहिती देतात,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nitesh Rane - Disha Salian
Chandrashekhar Bawankule Big Announcement: विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा, महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी केली होती.त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले होते.

यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले होते. खासदार नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे याआधी अनेकदा दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. तसेच या प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले होते.

Nitesh Rane - Disha Salian
Sharad Pawar News: विधानसभेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी लागली कामाला; विदर्भात पक्ष बांधणीसाठी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com