Rajan Salvi sarkarnama
कोकण

Rajan Salvi : 'अटक झाली तरी चालेल', ठाकरे गटातील आमदाराच्या निवासस्थानी एसीबी

ACB Enquiry : राजन साळवी यांच्या निवासस्थानासह अन्य तीन ठिकाणी एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केली.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri : उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी अँटी करप्शनच्या पथकाकडून (एसीबी) छापा टाकत घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी राजन साळवी तेथे उपस्थित नव्हते. मात्र, मला अटक झाली तरी चालेल. अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही. याचे परिणाम काहीही होऊ देत सामोरे जाण्याची तयारी आहे, असे म्हणत राजन साळवी यांनी थेट एसीबीलाचा आव्हान दिले.

उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर एसीबीकडून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी साळवी यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi ) यांच्या निवासस्थानासह अन्य तीन ठिकाणी एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आमदार साळवी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर एकनिष्ठ असून त्यांचाही आपल्यावर विश्वास आहे. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके शिवसैनिक होतो. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून मला त्रास देण्याचे काम सुरू आहे. पण मी या सगळ्याला सामोरे जायला तयार आहे. मी या कशाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी सकाळीच एसीबीच्या पथकाने धडक देत चौकशी सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी आमदार राजन साळवी यांचे बंधू दीपक साळवी व आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक हे घरी होते.

एसीबी कपडे तपासते...

एसीबीचे पथक राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले तेव्हा राजन साळवी यांचे बंधू दीपक साळवी घरी होते. पथकातील अधिकाऱ्यांनी दीपक यांना या चौकशी विचारले असता ते म्हणाले, घरात कपडे किती आहेत,याची तपासणी ते करत आहेत. त्यांचा काम त्यांना करु द्या. लवकरच राजन साळवी देखील येतील. आम्ही घाबरतो काय, असे देखील दीपक साळवी म्हणाले.

तब्बल सहा वेळा चौकशी

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एसीबी कार्यालयात आमदार राजन साळवी यांची आतापर्यंत तब्बल सहा वेळा चौकशी झाली होती. अलीकडेच त्यांनी मी आता कोणत्याही चौकशीला एसीबी कार्यालयात येणार नाही. त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करून मला तुरुंगात टाकावे, असे खुले आव्हान दिले होते. त्यानंतर आता काही दिवसातच आज पुन्हा एसीबीचे पथक राजन साळवी यांच्या घरी दाखल झाला आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT