Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंचे आमदार अपात्र करण्याच्या याचिकेवर कोर्टाचे आदेश; 'अध्यक्षांनी भूमिका...'

Shiv Sena 16 MLA Disqualification Case Update : "गोगावलेंच्या व्हिपप्रमाणे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हायला हवेत.."
Shiv Sena MLA Disqualification :
Shiv Sena MLA Disqualification :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. निकालाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल गेली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्याच आमदारांना पात्र ठरवण्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेने नार्वेकरांच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. ठाकरे गटाच्या 14 आमदारांना पात्र ठरविण्याच्या अध्यक्षांच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिंदे गटाच्या याचिकेवर आता हायकोर्टाने पुढची तारीख दिली आहे. (Latest Marathi News)

Shiv Sena MLA Disqualification :
Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी

विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावून 8 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. तत्पूर्वी, ही याचिका दोन दिवसांपूर्वी करण्यात आली आणि आज ती सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यामागील कारण न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Shiv Sena MLA Disqualification :
Raosaheb Danve News : ठाकरे गटाचे आमदार अपात्र कधी होणार? रावसाहेब दानवेंनी दिले उत्तर...

नवीन याचिका एक-दोन दिवसांत सूचिबद्ध केल्या जातील, अशा सूचना आपण आपल्या कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत. त्याचमुळे गोगावले यांनी केलेली याचिका आज सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली. या नव्या बदलामुळे याचिकेवर लवकर सुनावणी होत, असून प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होईल, असे न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाचा दावा -

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात खरी शिवसेना (Shiv Sena) शिंदेंची आहे आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) प्रतोदपदी अधिकृत होते, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. असे असेल तर या गोगावलेंच्या व्हिपप्रमाणे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र व्हायला हवेत, असा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. आणि याचसाठी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com