Rajan Salvi : मला अटक केली तरी चालेल, ACB कार्यालयात येणार नाही; साळवी अधिकाऱ्यांवर संतापले

Maharashtra Politics: माझ्या आईवर झालेल्या उपचाराच्या खर्चाचा तपशीलदेखील एसीबीने मागितला.
Rajan Salvi
Rajan SalviSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri : 'माझ्यावर जी कारवाई करायची ती करा, मी यापुढे चौकशीसाठी हजर राहणार नाही, मला अटक केली तरी चालेल,' असे मी लाचलुचपत अधिकाऱ्यांना सांगितले,' असे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले. काल (बुधवारी) एसीबी कार्यालयाकडून साळवी यांच्या कुटुंबीयांची सुमारे एक तास चौकशी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

साळवी म्हणाले, 'रायगड लाचलुचपत विभागातर्फे दीड वर्षापासून माझ्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे, मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. माझ्या आईवर झालेल्या उपचाराच्या खर्चाचा तपशीलदेखील एसीबीने मागितला आहे.'

काल (बुधवारी) साळवी यांचे बंधू, वहिनी, पुतण्या यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एसीबीने नोटीस बजावली होती. त्यावर साळवी कुटुंबीयांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार काल ते उपस्थित होते.

'प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या वहिनी अनुराधा दीपक साळवी उपस्थित राहू शकल्या नाहीत. माझ्या गाड्या किती किलोमीटर फिरल्या. डिझेल खर्च किती झाला, याची माहिती एसीबीने मागितली आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करून ते पाठीशी असल्याचे सांगितले,' असे साळवी म्हणाले.

'माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाकडे मोठे घबाड असल्याचे सरकारला वाटत आहे. पण आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असून हे सर्व भाजपचं (BJP) षड्यंत्र असल्याची टीका साळवी यांनी यापूर्वी केली आहे.

R...

Rajan Salvi
Maharashtra Politics: रेडा दूध देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र काहींना ते कळलेच नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com