Vaibhav Naik Sarkarnama
कोकण

ACB Inquiry : उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्या भोवती फास आवळला, एसीबीने पाठवली नोटीस; 'त्या' मालमत्तेमुळे अडचणीत?

Shiv Sena UBT Vaibhav Naik : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार वैभव नाईक यांच्या एससीबी चौकशीला वेग आला आहे. एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

Roshan More

Vaibhav Naik News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईक यांच्या मालमत्तेच्या चौकशीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशीला वेग आली आहे.

एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून नाईक यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. दरम्यान, वैभव नाईक म्हणाले, 2022 पासून सुरू असलेली ही चौकशी अन्यायकारक असू दबावाला बळी पडणार नाही.

वैभव नाईक यांनी कणकवलीमध्ये 2002 आणि 2006 मध्ये दोन गाळांची खरेदी केली होती. त्यासंदर्भात अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून 2022 पासून नाईक यांची चौकशी सुरु केली. गेल्या पाच वर्ष ही चौकशी सुरू आहे.

दबावाला बळी पडणार नाही

कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. चौकशीला आम्ही सामोरे जाऊस असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे. ते म्हणाले,गेली पाच वर्ष एखाद्या माणसाची चौकशी सुरू करताय. माझ्यासोबत सुरू झालेल्या अनेकांच्या चौकशा बंद झाल्या आहेत. फक्त माझीच चौकशी सुरू आहे, या विरोधात लढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT