Rajan Salvi sarkarnama
कोकण

MLA Rajan Salvi : 'माझ्याकडे खोके सापडले नाहीत, माझं उत्पन्न...'; राजन साळवी पेटून उठले

ACB raids Shiv Sena MLA Rajan Salvi : साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या आजच्या ACB च्या कारवाईचा मी धिक्कार करीत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीने झाडाझडती घेतली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्या प्रकरणी राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर देखील गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता ईडीला माझ्यावर गुन्हाच दाखल करायचा आहे. माझ्याकडे खोके सापडले नाहीत. सुरू असलेली कारवाई हे सरकारचं षडयंत्र आहे असा आरोप साळवी यांनी केला आहे.

माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करणं हे चुकीचं आहे. आतापर्यंत 6 वेळा चौकशी झाली, सगळी माहिती दिली. परंतु माझं उत्पन्न हे माझ्या व्यवसायातून आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. अँटी करप्शन विभागाकडून आज सकाळी सुरू करण्यात आलेली चौकशी अद्याप सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू आहे.

दरम्यान, आता सायंकाळी उशिरा अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी(ता.18) दिवसभराची चौकशी पूर्ण झाली आहे. अखेर सायंकाळी 7 वाजता ही कारवाई संपली. अँटी करपशन चे अधिकारी काही कागदपत्र घेऊन आज परतले व आजची कारवाई पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे

आमदार राजन साळवी म्हणाले, पुढील कारवाईसाठी आपण सामोरे जाणार असून आम्ही कोणीही कोर्टात जाणार नाही जी काही कारवाई होईल त्याला आपण सामोरे जाऊ असा आमदार राजेश साळवी यांनी स्पष्ट केले आहे. आपली पत्नी व मुलगा सध्या आहे कुणीकडे असं विचारतात ते म्हणाले की 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त आयोजित हळदीकुंकू आहे त्याचे साहित्य आणण्यासाठी माझी पत्नी मुंबई येथे गेली आहे ती उद्या सकाळी येईल असेही आमदार राजन साळवी यांनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मी कोणतीही चूक केलेली नाही मी दोषी नाही त्यामुळे अटकपूर्व साठी मी कुठेही अर्ज करणार नाही मला घेऊन जाऊन देत कोर्टात सादर करू दे आणि माझा न्याय देवते वरती विश्वास आहे की न्यायदेवता मला जामिनावर मुक्त करेल असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला आहे.

आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर रत्नागिरी येथील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मिंधे सरकार चोर है अशा जोरदार घोषणा देत शिवसेना नेते विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावाने ही घोषणाबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते ही राजन साळवी यांच्या कारवाईनंतर आक्रमक झाले आहेत.

खासदारांचा राऊतांचा आरोप...

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी ही कारवाई म्हणजे सरकार सूड बुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे.

राऊत म्हणाले, साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या आजच्या ACB च्या कारवाईचा मी धिक्कार करीत आहे. कितीही त्रास झाला तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या आमदार राजन साळवी आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास देवून मिंधे गटामध्ये सामील होण्यासाठी अशी कपट कारस्थाने केली जात आहेत. परंतु अशा दमनशाहीला भीक न घालणाऱ्या आमदार राजन साळवी यांचा मला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT