PCMC Corona Scam : कोरोना घोटाळ्यात ठेकेदार अडकले, मात्र अजित पवार सुटले

Shekhar Singh : एकाही रुग्णावर उपचार न करता सव्वातीन कोटी लाटणाऱ्या कोरोना सेंटर चालकाला दणका,रक्कम परत घेणार
PCMC Latest News
PCMC Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : कोरोना महामारीत भोसरीत दोन कोरोना सेंटरमध्ये एकाही रुग्णावर उपचार न करता सव्वातीन कोटी रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उकळणाऱ्या स्पर्श हॉस्पिटल या कोरोना सेंटरचालक ठेकेदाराला आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी मोठा दणका दिला.त्यांनी दिलेली ही रक्कम वसुलीचा आदेश नुकताच काढला.त्यामुळे उच्च न्यायालयात गेलेल्या उद्योगनगरीतील या गाजलेल्या स्पर्श घोटाळ्यात अखेर न्याय झाला.

सध्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हे पिंपरी महापालिका (PCMC) आय़ुक्त असताना हा कोरोना घोटाळा झाला होता. 3 कोटी 29 लाख चाळीस हजार रुपयांचे हे बिल देताना अनियमतता झाल्याचे स्पष्ट झाल्याने स्पर्श हॉस्पिटलच्या अनामत तसेच बाकी बिलातून ते वसूल करावेत,असा आदेश शेखरसिंहानी(Shekhar Singh) दिला आहे.

PCMC Latest News
PCMC News : लाचखोरी, फसवणूक अन् आता खुनाच्या गुन्ह्यातही कर्मचारी; पिंपरी महापालिकेत चाललंय तरी काय?

त्यावेळचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी स्थायी समितीच्या परवानगीविना हे बिल दिले होते. त्यांनी आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता तसेच या कामातील अनिनियमितता बेकायदेशीररित्या ओव्हररुल करून स्पर्शला हे बिल दिले होते.त्याविरोधात पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

त्यावर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले न्यायालयाने दिले होते.दरम्यान,या घोटाळ्यानंतर अजित पवारांची बीडला बदली करण्यात आली.त्यांना आयएएस केडरही मिळाले.त्यानंतर ते रिटायर झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान,याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका सभागृहात या कोराना घोटाळ्याविरोधात आवाज उठविलेले विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) माजी नगरसेवक योगेश बहल यांनी शुक्रवारी (ता.18)केली. स्पर्शचे संचालक आणि व्यवस्थापनाने महापालिकेची लूट केल्याचे आयुक्तांच्या निर्णयावरून स्पष्ट झाल्याचे सांगत त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना अद्दल शिकविण्यासाठी ते गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्श हॉस्पिटलचे संचालक विनोद आडसकर यांच्या पत्नी महापालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. नात्यातील सदस्य महापालिकेत काम करीत असताना ठेकेदारी करता येत नाही, हा कायदा असतानाही आडसकर यांनी या कायद्याची पायमल्ली केली असल्याने त्यांच्या पत्नीला महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बहल यांनी आय़ुक्तांकडे आता केली. ती मान्य न केल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

PCMC Latest News
Sushilkumar Shinde : 'हिंदू दहशतवाद' हा शब्द वापरणाऱ्या शिंदेंसाठी भाजप पायघड्या घालणार का...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com