Ratnagiri : आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीने झाडाझडती घेतली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्या प्रकरणी राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर देखील गुन्हा दाखल केला आहे. राजन साळवी यांना कधीही अटक होण्याची शक्यता असताना आपण अटकेला घाबरत नाही, असे म्हणत साळवी यांनी थेट एसीबीलाच आव्हान दिले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण कायम असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एसीबीच्या कारवाईनंतर आता उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना फोन केला.
फोनवरून उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) यांनी राजन साळवी ( Rajan Salvi ) यांना धीर दिला. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. तर, राजन साळवी यांना शिंदे गटात घेण्यासाठी हे दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानासह आणखी तीन ठिकाणी झाडाझडती घेतली. त्यामध्ये साळवी यांच्या हाॅटेलचा देखील समावेश होता.
माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे दुर्दैवी आहे. मला अटक होऊ शकते. मात्र मी अटकेला घाबरत नाही. कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास आपण तयार आहोत, असे राजन साळवी यांनी सांगितले. एसीबीचे पथक राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले तेव्हा राजन साळवी यांचे बंधू दीपक घरी होते. पथकातील अधिकाऱ्यांनी दीपक यांना या चौकशीच्या संदर्भात माहिती देत तशी ऑर्डर दाखवली.
एसीबी कार्यालयात आमदार राजन साळवी यांची आतापर्यंत तब्बल सहा वेळा चौकशी झाली होती. अलीकडेच त्यांनी मी आता कोणत्याही चौकशीला एसीबी कार्यालयात येणार नाही. त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करून मला तुरुंगात टाकावे, असे खुले आव्हान दिले होते. या आव्हानानंतर अवघ्या काही दिवसांत एसीबीचे पथक साळवे यांच्या घरी आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.