Aditi Tatkar News : श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे या विजयीच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यांनी शरद पवारांचे उमेदवार अनिल नवगणे यांचा पराभवाच्या छायेत आहेत. राजेंद्र ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असल्याचे मोठी चूरस होती. मात्र अदिती तटकरे यांचा एकतर्फी विजय मिळवला.
2019 च्या निवडणुकीत आदिती तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा तब्बल 29 हजार 621 मतांनी पराभव केला होता. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सरकारमध्ये आदिती यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांचा पराभव केला होता. श्रीवर्धन मतदारसंघातमध्ये 29 हजार 872 मतांचेच मताधिक्य सुनील तटकरेंना मिळाले होते. त्यामुळे विधानसभेला देखील आदित्य ठाकरेंसाठी ही जागा सेफ असल्याच्या चर्चा होत्या.
2008 च्या मतदारसंघांच्या रचनेनुसार श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा तळा या तालुक्यांचा समावेश होतो. तर रोहा तालुक्यातील काही भागाचा समावेश होता. मात्र, या मतदारसंघावर तटकरे कुटुंबाचे वर्चस्व पाहण्यास मिळते. 2009 मध्ये सुनील तटकरे येथून विजयी झाले. 2014 ला सुनील तटकरे हे लोकसभेत गेले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत अवधुत अनिल तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होत्या. त्या देखील विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादीतील फूटीनंतर सुनील तटकरे आणि आदिती यांनी अजित पवारांन साथ दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.