Aurangabad West Assembly Election Result: औरंगाबाद पूर्व मध्ये इम्तियाज जलील यांनी अतुल सावेंना घाम फोडला

Imtiaz Jaleel challenges Atul Save in Aurangabad East: पाचव्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा भाजपच्या अतुल सावे यांना 1531 तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना 40,751 मते मिळाली होती.
Aurangabad East Assembly Constituency
Aurangabad East Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विधानसभेच्या पूर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या पहिल्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या चारही फेऱ्यांमध्ये इम्तियाज जलील हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या इम्तियाज यांनी पाचव्या फेरीअखेर महायुतीचे अतुल सावे यांच्यावर तब्बल 37 हजार 685 मतांनी आघाडी घेतली आहे. महायुतीचे मंत्री अतुल सावे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील अशी थेट लढत पूर्व मतदार संघामध्ये झाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

परंतु मुस्लिम मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होऊन अतुल सावे (Atul Save) यांना याचा फायदा होईल, अशी अपेक्षा असताना सुरुवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये मात्र असे काहीही घडताना दिसत नाही. पाचव्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा भाजपच्या अतुल सावे यांना 1531 तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना 40,751 मते मिळाली होती.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा

Aurangabad East Assembly Constituency
Aurangabad East Assembly 2024 : मराठा मतदार ठरवणार 'औरंगाबाद पूर्व'चा आमदार कोण! सावे-इम्तियाज टेन्शनमध्ये

समाजवादी पार्टीच्या गफार कादरी यांना 366, काँग्रेसचे लहू शेवाळे यांना 955 तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना 354 एवढी मते मिळाली. (Imtiaz Jaleel) गफार कादरी, अफसर खान आणि इम्तियाज जलील हे तीन प्रमुख चेहरे पूर्व मतदार संघात असल्यामुळे मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होईल, असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता.

Aurangabad East Assembly Constituency
Aurangabad East Constituency : औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे-इम्तियाज जलील यांच्यात चुरशीचा सामना, मतांचे ध्रुवीकरण ठरवणार निकाल!

मात्र प्रत्यक्ष मतमोजणी च्या फेऱ्या जसजशा पूर्ण होत आहेत तसे मुस्लिम मतदान इम्तियाज जलील यांना एकगठ्ठा झाल्याचे दिसत आहे. याशिवाय जाहीर सभेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी निवडून आल्यावर आवाज उठवण्याचे शपथपत्र इम्तियाज जलील यांनी दिले होते.

Aurangabad East Assembly Constituency
Asaduddin Owaisi : कुछ तो पॉलिटिक्स है; 'AIMIM'ची महाराष्ट्रात पिछेहाट, 288 पैकी 14 जागांवर लढाई

याचाही काही प्रमाणात इम्तियाज जलील यांना फायदा होताना दिसतो आहे. अर्थात अद्याप मतमोजणीच्या फक्त पाच फेऱ्या झाल्या आहेत, पुढील फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक प्रचारात इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप केले होते.

Aurangabad East Assembly Constituency
Aurangabad East Assembly Election : सज्जाद नोमाणींच्या निर्णयाने 'एमआयएम'ची कोंडी

तर त्याला अतुल सावे यांनी पुरावे द्या अन्यथा माफी मागा, असे म्हणत आव्हान दिले होते. पाचव्या फेरी अखेर इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर मिळवलेली तब्बल 38 हजार मतांची आघाडी ही निश्चितच मोठी असून यामुळे तूर्तास तरी अतुल सावे यांना घाम फुटल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com