Ahilyanagar DCC Bank Election 1 Sarkarnama
कोकण

Ahilyanagar DCC Bank Voter List : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय कस लागणार! हजारभर ठरावांवर अपात्रतेची टांगती तलवार; मतदारसंख्या घटणार

Scrutiny of member resolutions may reduce Ahilyanagar DCC Bank election voters by nearly 1,000 : 5,890 सभासद संस्थांच्या ठरावांची छाननी सुरू; बंद संस्था, रद्द नोंदणी, शेअर रक्कम न भरल्याने अनेक ठराव बाद होण्याची शक्यता, अंतिम मतदार यादीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Cooperative Bank News : अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे जमा व्हायला लागले आहेत.

मात्र या ठरावांची सहकार विभागाकडून छाननी होणार आहे. या छाननीत पात्र नसलेले किमान एक हजार ठराव विविध कारणांनी वगळले जाणार असल्याचा अंदाज आहे. यातून बँकेच्या निवडणुकीच्या मतदार संख्येत, मोठी घट होणार असून, मोठा राजकीय कस लागणार असल्याचे संकेत आहेत.

जिल्हा बँकेच्या सभासद अधिकार असलेल्या विविध प्रकारच्या 5 हजार 890 सभासद संस्था आहेत. मतदार यादी (Voter List) तयार करण्यासाठी सभासद संस्थांना 16 जुलैपर्यंत ठराव करण्याची मुदत होती. आता दाखल झालेल्या या ठरावाची छाननीत किती ठराव वगळले जातात, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेने (DCC Bank) 1 जून 2013 रोजी सभासदांची संख्या निश्चित केली होती. त्यानुसार ही संख्या 5 हजार 890 झाली आहे. यात विविध कार्यकारी सेवा संस्था 1 हजार 414, शेतीपूरक संस्था 2 हजार 139, बिगरशेती 2 हजार 337 संस्था सभासद आहेत. या सर्वच संस्थांचे ठराव झाले आहेत.

यातील काही संस्था बंद पडल्या आहेत. काहींची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. काहींचे अधिकार कापले गेले आहेत. बंद पडलेल्या पतसंस्था, विलीनीकरण झालेल्या पतसंस्था अशाही सभासद संस्थांकडून मतदाराच्या नावाने ठराव आले आहेत. छाननीत हे ठराव मतदानास पात्र ठरणार की नाही ठरणार हे पुढे ठरेल.

जिल्हा सहकारी बँकेच्या शेअरची रक्कम ही 5 हजार रुपये करण्यात आलेली आहे. ज्या सभासद संस्थांनी ही रक्कम जमा केलेली नाही, अशा सभासद संस्थेच्या ठरावावर अपात्रतेची टांगती तलावर असणार आहे. या छाननीत तब्बल 1 हजाराने घट होईल, असा अंदाज सहकार विभागातून व्यक्त केला जात आहे.

छाननीनंतर पात्र सभासदांची यादी नाशिक विभागीय सहकार कार्यालयाकडे पाठवली जाईल. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर होईल. त्यावर हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. त्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT