पाली नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड झाली.
सर्व नगरसेवकांनी एकमताने बेनसेकर यांच्या नावाला पाठिंबा दिला.
या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक राजकारणात बळ मिळाले आहे.
Raigad News : आगामी स्थानिकच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुकांनी कंबर कसली आहे. अशातच अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुलतान बेनसेकरांची निवड केली आहे. नुकताच नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीने राजकीय खेळी करत चार नगरसेवक असणाऱ्या भाजपच्या पराग मेहता यांना पाठिंबा दिला आणि ते नगराध्यक्ष झाले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हातात आलेली संधी गमवावी लागली.
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. आधी तिरंगी होणाऱ्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेत राजकीय खेळी खेळत शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज एक दिवस आधीच नाटकीय घडामोडीत मागे घेतला.
तसेच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपलाच पाठिंबा दिला. यामुळे ही निवडणूक दुरंगी झाली आणि पराग मेहता यांना नऊ मतांनी विजयी झाले. ज्यात शिवसेनेच्या कल्याणी दबके यांना पाच मते मिळाली. यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला. ज्याची आता कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान बुधवारी (ता.1) पाली नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली ती झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुलतान बेनसेकर यांच्या नावाला सर्व नगरसेवकांनी एकमुखाने सहमती दिल्याने त्यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे, नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. नगर पंचायतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एका व्यासपीठावर दिसल्याने पालीच्या राजकारणात सकारात्मक वातावरणाची नांदी असल्याचे संकेत मिळत आहेत.
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
सुलतान बेनसेकर यांच्या बिनविरोध निवडीची बातमी जाहीर होताच पाली शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताश्यांच्या गजरात व घोषणाबाजीसह सुलतान बेनसेकर यांची भव्य मिरवणूक पाली बाजारपेठेतून काढण्यात आली. नागरिक, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी फुलांच्या हारांनी उपनगराध्यक्षांचे स्वागत केले.
17 सदस्य असणाऱ्या नगरपंचायतीत 2 सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले होते. तर उर्वरीत 15 सदस्यांमध्ये मतदान पार पडले. सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 5, शिवसेना (एकनाथ शिंदे) 5 नगरसेवक, भाजप 4 नगरसेवक आणि शेकाप 1 नगरसेवक अशी पक्षीय बलाबल आहे.
प्र.१: पाली नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी कोण निवडले गेले?
उ: राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुलतान बेनसेकर निवडले गेले.
प्र.२: ही निवड कशी झाली?
उ: ही निवड बिनविरोध झाली.
प्र.३: नगरसेवकांचा यामध्ये काय प्रतिसाद होता?
उ: सर्व नगरसेवकांनी एकमताने बेनसेकर यांच्या नावाला पाठिंबा दिला.
प्र.४: या निवडीचा राजकीय परिणाम काय होईल?
उ: राष्ट्रवादी काँग्रेसला पाली नगर पंचायतीत मजबूत स्थान मिळेल.
प्र.५: ही निवड कोणत्या पक्षाच्या नेत्यासाठी यश मानली जाते?
उ: ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठे यश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.