Mahayuti Politic's : महामंडळ वाटपाची तटकरेंनी सांगितली डेडलाईन; पुढच्या आठवड्यातील ‘या’ दिवशी होणार फैसला!

Mahamanda's Distribution : महायुती सरकारच्या नऊ महिन्यांनंतरही महामंडळाचे वाटप झालेले नाही. अजित पवारांनी तातडीने वाटपाचे आश्वासन दिले असून, समन्वय बैठकीत निर्णय होणार अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on
  1. महामंडळ वाटपात सतत विलंब – महायुती सरकारला नऊ महिने पूर्ण झाले तरी महामंडळांचे अध्यक्षपद वाटप झालेले नाही; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

  2. समन्वय समितीचा फॉर्म्युला – तीनही पक्षांच्या आमदारसंख्येनुसार ‘अ’ व ‘ब’ अशी वर्गवारी करून मंडळांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठक होणार आहे.

  3. पूर्वीच्या आश्वासनांचा भंग – याआधीही अनेक वेळा तारीखा जाहीर होऊनही वाटप न झाल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला आहे.

Nagpur, 18 September : महायुती सरकार सत्तेवर येऊन जवळपास नऊ महिन्यांचा कार्यकाळ उलटला आहे. मात्र, अद्याप महामंडळांचे वाटप झालेले नाही. महामंडळांचे वाटप कधी होणार, याकडे महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे डोळे लागले आहेत. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘आम्ही कोणालाच प्रतीक्षा करायला लावणार नाही, झटपट मंडळांचे वाटप करण्यात येईल,’ असे जाहीरपणे सांगितले होते.

अजित पवारांनंतर (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही येत्या मंगळवारी तीनही पक्षाच्या समन्वय बैठकीत याचा फैसला होणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे ‘पुन्हा गाजराची पुंगी’ अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) शहरात दाखल झाले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. तीनही पक्षांच्या आमदारांच्या संख्येनुसार मंडळांचे वाटप केले जाणार आहे. त्यातही अ आणि ब अशी वर्गवारी करण्यात आली आहे. याकरिता तीनही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या बैठका काही कारणांमुळे होऊ शकल्या नाहीत. मात्र, येत्या मंगळवारी याबाबत बैठक ठरली आहे. त्यात कुठल्या पक्षाला किती मंडळे आणि कुठली द्यायची, याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर त्याचा आराखडा तयार केला जाईल. मंडळाची यादी संबंधित पक्षाच्या प्रमुखांकडे सोपविली जाईल. त्यानंतर कोणाला मंडळ वाटप करायचे, याचा निर्णय पक्षाला घ्यायचा असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare
Chandrakantdada on Vote Chori : महाराष्ट्र अन्‌ यूपीत त्यावेळी तुम्ही मतचोरी केली होती का?; चंद्रकांतदादांचा राहुल गांधींना सवाल

विशेष म्हणजे महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महामंडळांचे वाटपच करण्यात आले नव्हते. अनेकदा मुहूर्त आणि तारखा जाहीर केल्या होत्या. काहींना पत्र तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शेवटपर्यंत महामंडळांचे अध्यक्ष जाहीर करण्यात आले नव्हते, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला होता. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. फक्त निवडणुकीत आमच्याकडून कामे करून घ्यायचे काय, असा सवाल उपस्थित केला होता.

महायुतीची सत्ता पुन्हा आल्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेची दखल घेतली. आमच्या विजयात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे, हे त्यांनी मान्य करून यावेळी कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले होते.

Sunil Tatkare
Rajan Patil : अजितदादांनी बॅलन्स साधला; उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष, तर राजन पाटलांना लाल दिवा!

हिवाळी अधिवेशन आटोपताच लवकरात लवकर मंडळांचे वाटप केले जाईल, सात उमेदवारांपैकी सहा आमदार निवडणून आल्याने विदर्भाला झुकते माप दिले जाईल, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही फक्त चर्चा झाली, मंडळे मात्र अद्याप कुणालाच मिळालेली नाहीत.

प्र.1: महामंडळांचे वाटप कधीपासून प्रलंबित आहे?
उ. – महायुती सरकारच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळापासून हे प्रलंबित आहे.

प्र.2: मंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय आहे?
उ. – तीनही पक्षांच्या आमदारसंख्येनुसार आणि ‘अ’ व ‘ब’ वर्गवारीनुसार वाटप होणार आहे.

प्र.3: पुढील निर्णायक बैठक कधी ठरली आहे?
उ. – येत्या मंगळवारी तीनही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे.

प्र.4: कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे कारण काय आहे?
उ. – वारंवार आश्वासन देऊनही मंडळांचे अध्यक्ष जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com