Mahayuti Politics : तळकोकणात महायुतीत युतीच्या घोषणेपेक्षा स्वबळाचाच नारा, भाजप, शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही घोषणा

NCP MLA Shekhar Nikam On local body elections : तळ कोकणात सध्या महायुतीत कोणता पक्ष मोठा याची स्पर्धा सुरू झाली आहे. याचदरम्यान स्थानिकच्या तोंडावर रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत युतीच्या घोषणेपेक्षा स्वबळाचाच नारा ऐकण्यात येत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तळ कोकणासह राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत

  2. या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसत असून तळ कोकणात जोरदार तयारी सुरू आहे

  3. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजप शिवसेनेपाठोपाठ स्वबळाचाच नारा दिला आहे

Ratnagiri News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. रत्नागिरीत भाजपसह शिवसेना पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देत पक्ष प्रवेशावर भर देताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजप शिवसेनेपाठोपाठ स्वबळाचाच नारा दिला आहे. आमदार शेखर निकम यांनी महायुतीतील मित्र पक्षांना थेट इशारा देत महायुती झाली तर सन्मानाने आमच्या हक्काच्या जागा, अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, असे म्हणत इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या निवडणुकीत महायुती असणार की नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा वांझोळे येथे पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास त्या जिंकून आणण्याचा विश्वास प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केला. मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, माजी सभापती विजय गुजर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निकम यांनी, 2029 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करू नका, आपलं काम करत राहा. आता युती होईल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. झाली तर ठीक आणि नाही झाली तर आपण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवूया, असा कानमंत्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

Ajit Pawar
Mahayuti Politics : CM फडणवीसांनी सर्वच महापालिकांबाबत घेतलेल्या 'त्या' मोठ्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे नाराज?

तसेच जिल्ह्यात जर महायुती म्हणून निवडणुकीला समोरे जाण्याचे ठरलेच तर सन्मानाने जागांचा तोडगा निघायला हवा. आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आम्हाला कोणी कमी लेखू नये. जर युती झाली नाही तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे असेही निकम यांनी म्हटलं आहे.

याचवेळी निकम यांच्याकडे हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातून मंगेश बांडागळे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. यावरून निकम यांनी, मंगेश हा एक सामान्य कार्यकर्ता असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सातत्याने काम करत आला आहे. माझ्यासोबत तो सुरुवातीपासूनच निष्ठेने उभा असून त्यांच्यासाठी आपण पक्षाकडे नक्कीच शब्द टाकू असेही आश्वासन निकम यांनी दिले आहे.

प्रदीप कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास त्या जिंकून आणणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तर खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी 2024च्या निवडणुकीत चूक झाल्याचे कबुल करत कमी पडल्याचे सांगितले. निकम यांचा विजय संगमेश्वरने मदत केल्याने झाला. त्यामुळेच आम्ही चिपळूणमध्ये फटाके फोडले. मात्र आता आम्ही गाफील राहणार नसल्याचेही दाभोळकर यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar
BJP, Mahayuti Politics: भाजप निष्ठावंतांपुढे चिंता...ज्यांनी भाजपला केला विरोध, त्यांचाच करावा लागणार प्रचार!

FAQs :

प्रश्न1. तळ कोकणासह राज्यात कोणत्या निवडणुकीची तयारी सुरू आहे?

उ : तळ कोकणासह राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत
प्रश्न2. तळ कोकणात सध्या कसली तयारी सुरू आहे?

उ : निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसत असून तळ कोकणात जोरदार तयारी सुरू आहे

प्रश्न3. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने कोणता नारा दिला आहे

उ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी महायुतीत युती झाली नाही तरी स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचे इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com