मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप होत असून रायगडचे राजकीय वातावरण तापले आहे.
या प्रकरणात सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप झाले असतानाच मुरुड महोत्सवातील त्यांचा डान्स चर्चेचा विषय ठरला आहे.
‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर झालेल्या जल्लोषामुळे राजकीय संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Raigad News : खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या घटनेनं ऐन निवडणुकीत राज्यात खळबळ उडवून सोडली आहे. या घटनेमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर येत असून या हत्येचा कट थेट प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या घरात शिजल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले होते. या आरोपांमुळे रायगडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मुरुड महोत्सवात तटकरे यांनी नगरपालिकेच्या विजयानंतर जल्लोष केला आहे. तसेच त्यांनी ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर डान्स देखी केला आहे. यावरून आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ देखी समोर आला होता. तर या हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव समोर आले होते. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील राजकीय वाद पुन्हा तापला होता. तर काळोखे यांच्या हत्येप्रकरणी 10 जणांविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
मंगेश यांच्यावर वार करण्यात आघाडीवर असणाऱ्या आरोपीचे कनेक्शन हे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडशी असल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॉडीगार्ड महेश धायतडक हा बीड जिल्ह्यातील आहे. यावरूनच आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोपी महेश हा वाल्मीक कराडचा निकटवर्तीय असल्याचा दावा कराताना त्याचे फोटो कराडसोबत असल्याचा दावा केला होता. तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोपी महेश हा वाल्मीक कराडचा निकटवर्तीय असल्याचा दावा केला होता. तसेच तटकरे हेच या हत्येमागे असल्याचा आरोपही केला होता. तर तेच येथील आका असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या अद्याप शांत झालेल्या नसतानाच तटकरे यांचा ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे. मुरुड महोत्सवात कार्यकर्त्यांनी हे गाणे तटकरे यांच्यासाठी लावले. गाणे सुरू होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात तुफान डान्स केला. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत सुनिल तटकरे यांनीही क्षणभर मंचावर डान्स करत आनंद व्यक्त केला.
यानंतर पत्रकारांनी आमदार थोरवे यांनी केलेल्या आरोपांचा धागा धरत तुम्हीच रायगडचे ‘डॉन’ आहात का असा सवाल केला. यावरून त्यांनी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच थेट हात जोडत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. सध्या तटकरे यांचा हा डान्स चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. राज्यातील राजकीय गुन्हेगारीला सुनील तटकरे पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसेच शिवसैनिकांनी तटकरेंनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे दोन्ही पक्षांतील वाकयुद्ध पेटले असून महायुतीमधील तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
1) मंगेश काळोखे हत्या प्रकरण कुठे घडले?
खोपोली शहरात ही धक्कादायक हत्या घडली आहे.
2) या प्रकरणात कोणावर आरोप झाले आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले आहेत.
3) आरोप कोणी केले आहेत?
शिंदे गटाचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी हे आरोप केले आहेत.
4) मुरुड महोत्सवातील डान्स का वादग्रस्त ठरला?
हत्या प्रकरणावर गंभीर आरोप सुरू असतानाच जल्लोष आणि डान्स केल्याने टीका होत आहे.
5) या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
रायगड जिल्ह्यातील निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.