Raigad Legislative Council election latest news : विधान परिषद निवडणुकीत कोकण जागा महायुतीतील जागावाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. असे असतानाही या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा सांगितला आहे. या जागेवर शिवसेनेचे नेते आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मोबदल्यात विधान परिषद अशी डिल राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झाल्याची चर्चा रंगली आहे. आता अशी डिल झाली नसल्याचे म्हणाणारे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झाल्याचे सांगितले आहे. यामुळे खरचं आता अशी डिल झाली होती का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात घुमू लागला आहे.
महायुतीने रायगड विधान परिषद मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार निश्चित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांच्या नावाची घोषणा केली. आज (ता.१) अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोकणातील महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र मंत्री भरत गोगावले गेले नाहीत. यामुळे महायुतीतील राजकीय ट्विस्ट अद्याप बाकी आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
पण या सर्व शक्यता नाकारत गोगावले यांनी आपल्याकडे कार्यकर्ते येणार असल्याने आपण गेलो नाही. पण आपल्या शुभेच्छा तटकरे यांना असल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत माहिती दिली. यावेळी गोगावले म्हणाले की, पालकमंत्री पदाबद्दल चर्चा झालेली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी या सगळ्यांची पालकमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे. आणि ते लवकर यावर निर्णय घेतील.
गोगावले यांच्या प्रतिक्रियेमुळेच आता गेली दीड वर्ष लटकलेला प्रश्न सुटणार असून अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचे आदेश आले म्हणून आपण थांबलो अन्यथा कोकणातील जागेवर वेगळे चित्र असतं असा दावा विकास गोगावले यांनी केला आहे.
कोकणातील जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत शेवटपर्यंत जुंपली होती मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत शिवसेनेने अखेर ही जागा राष्ट्रवादीला दिली. यानंतर अनिकेत तटकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर बोलताना विकास गोगावले म्हणाले की, ही जागा आमचीच होती. पण वरिष्ठांनी आदेश दिले म्हणून आम्ही थांबलो.
अन्यथा जिल्ह्यातील आणि कोकणातील चित्र वेगळं बघायला मिळालं असत. शिवसेनेची ताकद कोकणात सर्वाधिक असल्यामुळेच आम्ही ही जागा लढवत होतो. मात्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या आदेशापुढे कधीच गेलो नाही आणि जाणारही नाही. यामुळेच थांबलो असेही विकास गोगावले म्हणाले.
तसेच सध्या शिवसेना सावध पवित्रा घेत असून राजकारणात कोणी आजरामर नाही असाही इशारा विकास गोगावले यांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले की, पक्ष नेतृत्व सांगितले ते आम्ही मान्य केलं. मागच्या पुढच्या काही गोष्टी घडल्या त्या आम्ही बाजुला केल्या. मात्र आता ही शेवटची वेळ आहे. या पुढे थेट लोकसभा आहे, विधान सभा आहे. प्रत्येकाचा वेळकाळ असतो. राजकारणात कोणी आजरामर नसतो, आज त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर आम्हाला त्या गोष्टीचा विचार करावा लागेल असा थेट इशारा विकास गोगावले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.