Bharat Gogawale : मंत्री भरत गोगावलेंच्या रिटायरमेंटचे संकेत; मुलानेच दिली अपडेट, 'ती' इच्छा अपूर्णच?

Vikas gogawale statement Over bharat gogawale retirement : रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अंगावर घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत त्यांच्या मुलानेच मोठी माहिती दिली आहे.
Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
Eknath Shinde, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भरत गोगावले पुढील एक टर्म निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

  2. त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  3. विकास गोगावले भविष्यात निवडणुकीत उतरण्याची शक्यता चर्चेत आहे.

Raigad News : शिवसेना फुटीनंतर राज्यात महायुतीची सत्ता येऊपर्यंत भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाम साथ देताना दिसत आहे. पण आता गोगावले राजकारणात बाहेर जातील, ते रिटायर्ट होतील अशी माहिती त्यांचे चिरंजीव युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी दिली आहे. या माहितीमुळे आता कोकणासह शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तर विकास गोगावले यांनी, गोगावले हे पुढची टर्म लढतील, त्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा तर्क गोगावले राजकारणातून रिटायर्ट होतील असा लावला जात आहे. तसेच त्यांच्या जागी ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरतील असाही अर्थ लावला जात आहे.

राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच जागत असून या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे समोर येताना दिसत आहे. एकीकडे या प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे त्यांना पक्षातील आपल्या प्रदेशाध्यक्ष पदही सोडावे लागले आहे. याचप्रकरणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर देखील आरोप होत असून त्यांच्या बोटावरून मोठे आरोप झाले होते.

आता हे प्रकरण आता कुठे शांत होत असतानाच जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे नवे वादळ उठले आहे. याच मुद्द्यावरून विकास गोगावले यांनी तटकरेंवर आरोप केला आहे. त्यांनी आकाश चौधरी यांच्या सोबत असलेल्या मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या भागिदारीतील कंपन्यांविरोधात प्रश्न उपस्थित केला.

Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
'जादूटोण्याशी आमचा कधी संबध नाही', गोगावले काय बोलले? Bharat GogaWale, Ashok Kharat Case, Raigad

यावेळी ते म्हणाले, जयंत पाटील यांनी दिडशे कंपन्या सांगितल्या होत्या. त्या कंपन्या डिमॉलिश कुठे झाल्या. मी बोललो तर हेडलाईन बनेल. पण ते तपासातच समोर आलेलं बरं. तसेच जे काही तथ्य असेल ते समोर येईलच. जर काही चूक झाली असेल तर संबंधितांना त्याला सामोरे जावे लागेल, आणि जर चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

या आरोपावरून कोकणात पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच विकास गोगावले यांना पुढील निवडणुकीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता. पत्रकारांनी महाडमधून नवीन चेहरा म्हणून तुम्ही आमदारकी लढवणार का? असा सवाल केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केलं.

ते म्हणाले की, सध्या तरी तसा कोणताही विचार नाही. पुढील एक टर्म वडील तथा शिवसेना मंत्री भरत गोगावले स्वतः निवडणूक लढवतील. त्यानंतरचं माहित नाही. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास आपण स्वतः निवडणुकीच्या मैदानात असू. पण तो त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय असेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबतही स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश पाळणारे कार्यकर्ते असून शिवसेना पक्षाची शिस्त आहे. नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असतो.

Eknath Shinde Dials Bharat Gogawale for Emergency Mumbai Meet
तटकरेंचा थोरवेंवर 65 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, गोगवले काय बोलले? Sunil Tatkare, Bharat Gogawale

FAQs :

1. भरत गोगावले पुढील निवडणूक लढणार का?
हो, ते पुढील एक टर्म निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.

2. ते राजकारणातून निवृत्त होणार का?
पुढील टर्मनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3. ही माहिती कोणी दिली?
त्यांचे पुत्र विकास गोगावले यांनी ही माहिती दिली.

4. विकास गोगावले निवडणूक लढवणार का?
त्यांच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5. या घडामोडीचा परिणाम काय होईल?
शिवसेनेत आणि कोकणातील राजकारणात बदल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com