Kokan MLC Election; Bharat Gogawale, Mahendra Dalvi, Aniket Tatkare And Sunil Tatkare sarkarnama
कोकण

Sunil Tatkare : तटकरेंकडून पुन्हा शिवसेनेला धोबीपछाड, गोगावलेंसह थोरवेंची तलवार म्यान; पण दळवींच्या कन्येचं काय?

Aniket Tatkare Vs Juili Dalvi Kokan MLC Election : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुक होत असून सोमवारी (ता.१) अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. राज्यात आठ ठिकाणी महायुतीतच बंडाचे निशाण फडकले आहे. ज्यात कोकणाचा देखील समावेश आहे.

Aslam Shanedivan

Raigad Shivsena Politics News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका होत असून सोमवारी (ता.१) अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीसह महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य उघड झाले आहे. आता माघारीचा दिवस ४ जून असणार असून मविआसह महायुतीला नाराजांची मनधरणी करण्याची लढाई लढावी लागणार आहे. अशीच नाराजी कोकणात देखील समोर आली असून महायुतीला शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी दूर करण्यास कस लावावा लागणार आहे.

येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पूत्र अनिकेत तटकरे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आपला अर्ज भरला आहे. मात्र तटकरेंना विरोध करत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यामुळे येथे पुन्हा एकदा शिवसेना आणि तटकरे यांच्यातील वादाने डोके वर काढले आहे. आता हा वाद कसा शांत होतो, महायुतीतील नेते या प्रश्न कसा सोडवतात आणि अनिकेत तटकरेंचा मार्ग सुकर होतो का? याकडे कोकणासह राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागा आणि नागपूरमधील पोटनिवडणूक अशा एकूण १७ जागांच्या विधान परिषद निवडणूक होत आहे. महायुतीमधील जागावाटपात भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा सुटल्या आहेत. सोमवार (ता.१) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. मात्र प्रत्यक्ष अर्ज भरताना मित्रपक्षांकडून बंडाचे निशाण फडकविण्यात आले आहे. ज्यामुळे महायुतीसमोरच आता बंडखोरी शमविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः रायगड या महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीचे दोन मित्र पक्षांमध्येच कुरघोड्याचे राजकारण समोर आले आहे.

येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पूत्र माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. ज्यात शिवसेनेते आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती भूवया उंचावणारी होती. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या बदल्यात कोकण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्याचे महायुतीत ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार अनिकेत तटकरे यांना ही जागा सोडण्यात आली आहे. तर भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पण या सर्व घडामोडी दरम्यान आता तटकरेच पुन्हा एकदा रायगडचे धुरंधर ठरले असून त्यांनी आपल्या मुलासाठी कोकणच्या जागेसाठी उमेदवारी खेचून आणल्याची चर्चा आहे. तर कोकणात सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असूनही हे काम गोगावले यांना जमले नाही. त्यांचा मुलगा या जागेसाठी आग्रही असतानाही त्यांना पक्ष आदेश पाळत मुलाचा हट्ट पूर्ण करता आला नाही. उलट त्यांच्यासह आमदार महेंद्र थोरवे यांना आपल्या तलवारी म्यान करावी लागल्याची आता येथे चर्चा आहे.

एकीकडे गोगावले आणि थोरवेंच्या तलवारी म्यान झाल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ४ तारखेकडे रायगड जिल्ह्यासह कोकणाचे लक्ष लागले आहे. येथे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तसेच थेट तटकरे यांचे काम करणार नाही अशी भूमिका घेत विरोध ही दाखवला आहे.

यामुळे आता जुईली यांनी माघार न घेतल्यास ही निवडणूक गंतदार होणार असून सर्वाधिक मतदार असणाऱ्या शिवसेनेची मते दळवी यांच्या पारख्यात जाण्याची शक्यता आहे. यामुळेच आता तटकरेंसह राष्ट्रवादीची धडधड वाढली असून ते आता जोडण्यांकडे लागले आहेत. यामुळेच आता कोकणाच्या राजकीय वर्तुळात आमदार कन्या तटकरेंना घाम फोडणार की त्या देखील पक्षादेश म्हणून आपलीही तलवार म्यान करणार हे येत्या ४ तारखेला कळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT