नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात राजकीय वाद वाढला आहे.
सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला बोलावण्याची मागणी केली.
यावर प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आरोप फेटाळत तपास यंत्रणांना काम करू द्यावे असे म्हटले.
Sindhudurg News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांचे नाव खरातशी जोडले गेले आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा तर खरातबरोबर अनेक फोटो समोर आले आहेत. यावरून ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय नेत्यांवर आसूड ओढत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेत एसआयटी आणि गृहमंत्र्यांना तपासाबद्दल सवाल केले आहेत. तर शिंदे आणि केसरकर यांना पुन्हा डिवचत चौकशीला कधी बोलावणार? असा सवाल केला आहे. ज्यावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
सुषमा अंधारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा याची माहिती आता मुख्यमंत्र्यांनी सांगावी. जर ते खरे असतील तर... ते खरेच आहेत असे आम्ही मानतो. यामुळे महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार? केसरकर यांना कधी बोलवणार असा सवाल त्यांनी केला.
तसेच यावेळी रुपाली चाकणकर यांना गजाआड कधी करणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असेही आवाहन सुषमा अंधारेंनी राज्य सरकारला केलं आहे. यावरून आता वाद पुन्हा वाढताना दिसत असून सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतुने प्रेरीत आहेत असा पलटवार करताना जोरदार प्रत्युत्तर केसरकर यांनी केलं आहे.
केसरकर यांनी, खरात प्रकरणासंदर्भात सध्या एस.आय.टी. आणि ईडी चौकशी करत आहे. या चौकशात जर एखाद्याचे चुकून जरी कुठं नाव समोर आले तर त्या व्यक्तीला बोलवलं जातं आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून असे बोलावलं जात नाही. तर कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं, हा काही गुन्हा नाही. यामुळे सुषमा अंधारे यांनी केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देऊ नये. तसे करणेही योग्य नाही.
तसेच एसआयटी आणि ईडीला त्याचं काम करू द्या. जिथे जिथे त्यांना काही गोष्टींचा उलगडा होईल ते तेथे चांगल्या-चांगल्या लोकांना बोलावत आहेत. यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. पण खरात प्रकरणात माझा काही संबंध नसताना विनाकारण नावं घेणं, आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे. तेही केवळ आमची ओळख आहे म्हणून... असा पलटवार सुषमा अंधारेंच्या आरोपावर केसरकर यांनी केला आहे.
तर सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी केलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं कोणतंच बंधन आपल्यावर नसल्याचेही केसरकर यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे या एक राजकीय व्यक्ती असून त्यांच्याकडून राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं आम्ही दिली पाहिजेत असं बिलकुल नाही. यामुळेच या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. तर एसआयटी आणि ईडी त्यांची कारवाई करेल, असेही म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांना तंबी भरली आहे.
1. अशोक खरात प्रकरण काय आहे?
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण असून त्यात अनेक आरोप आणि तपास सुरू आहेत.
2. सुषमा अंधारे यांनी काय प्रश्न उपस्थित केले?
त्यांनी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावणार असा सवाल केला.
3. दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी आरोप फेटाळले आणि तपास यंत्रणांना स्वतंत्रपणे काम करू द्यावे असे सांगितले.
4. या प्रकरणात कोणती यंत्रणा तपास करत आहे?
SIT आणि ED या दोन्ही यंत्रणा तपास करत आहेत.
5. या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून तपासानुसार पुढील कारवाई होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.