Ashok Kharat Case : खरातचा तुरूंगातील स्टेटस काय? मुलाच्या आठवणीत व्याकुळ; जेवणही कमी, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...

Ashok Kharat SIT Probe : अशोक खरात कोठडीत जास्त कुणाशी बोलत नाही, सतत टेन्शनमध्ये असतो आणि त्यामुळे त्याचे जेवणही कमी केलं आहे. शिवाय तो एकाच जागेवर तासनतास शांत बसतो.
Ashok Kharat
Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 13 Apr : भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांनी आणि एसआयटीने तपासाची सूत्र वेगाने फिरवल्यामुळे दररोज खरात प्रकरणी धक्कादायक खुसाले होते आहेत. तर तपास यंत्रणांनी खरात भोवती चौकशीचा फास चांगलाच आवळल्यामुळे आता त्याची सुटका होणं जवळपास अशक्य असल्याचं बोललं जात आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे खरातला देखील आता तो तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री झाली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल चिंतेत आहे. पोलिसांनी सुरूवातीला अटक केली त्यावेळी खरातला जो कॉन्फिडन्स होता तो आता हळू हळू कमी झाल्याचं समोर येत आहे.

कारण खरात आता कोठडीत जास्त कुणाशी बोलत नाही, सतत टेन्शनमध्ये असतो आणि त्यामुळे त्याचे जेवणही कमी केलं आहे. शिवाय तो एकाच जागेवर तासनतास शांत बसतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर लोकांच्या भीतीने तो न्यायालयातील सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच सुनावणी घेण्याची विनंती अधिकाऱ्यांकडे करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat
Sharad Pawar vs BJP : "भाजपचं हिंदुत्व म्हणजे खरातचं..."; शरद पवारांना निधर्मी म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरेंच्या खासदाराची बोचरी टीका

दरम्यान, अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. तर खरातला त्याची बायको कुठे आहे? असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांनी विचारल्यावर त्याने 'ते देवालाच माहीत' असे उडवाउडवीचे उत्तर दिले आहे.

Ashok Kharat
Iran Ports Blockade : अमेरिकेने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं! आजपासून इराणच्या बंदरांवर ये-जा करण्यास सर्व देशांच्या जहाजांवर बंदी

मात्र, मुलगा हर्षवर्धनसाठी तो व्याकुळ असून माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांकडे करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने आज पुन्हा त्याला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील खरातला पोलीस कोठली सुनावली होती. त्यानंतर आज चौथ्या गुन्ह्यात पुन्हा त्याला पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com