Ashok Kharat Case : मोठी बातमी! प्रतिभा चाकणकर पोलिस ठाण्यात हजर, अशोक खरात प्रकरणात चौकशी...

Pratibha Chakankar Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्या आज शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्या आहेत.
Rupali chakankar, prtaibha chakankar
Rupali chakankar, prtaibha chakankar Sarkarnama
Published on
Updated on

Pratibha Chakankar News : शिर्डी पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या हजर झाल्या आहेत. त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

भोंदू अशोक खरात हा समता पतसंस्थेतील 132 खात्यांमध्ये नाॅमिनी आहे. त्यातील चार खाती चाकणकर कुटुंबीयांच्या नावे आहेत. दोन प्रतिभा चाकणकर यांच्या नावार तर दोन त्यांच्याी मुलांच्या नावावर खाती आहेत त्याचा नाॅमिनी अशोक खरात आहेत.

या बँक खात्यातून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. चाकणकर यांनी स्वतः पतसंस्थेत खाते उघडले की त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून भोंदू खरातने हे खाते उघडले याविषयी देखील चर्चा आहे.

अशोक खरात हा भक्तांकडून त्यांची आधारकार्ड, पॅनकार्डचे झेराॅक्स घेत होता. त्यामुळे त्याचा वापर करून त्याने पतसंस्थेत खाती उघडली का? ही भक्तांचा देखील यामध्ये सहभाग होता, याची चौकशी होत आहे. तब्बल 132 खात्यांमध्ये भोंदू खरात हा नाॅमिनी आहे.

Rupali chakankar, prtaibha chakankar
Rupali Chakankar News: चाकणकर कुटुंबियांना पोलिसांचा पहिला दणका! प्रतिभा चाकणकरांना नोटीस

खरातची कोठडी आज संपणार

भोंदू अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपणार आहे. दरम्यान एसआयटीकडून आज पुन्हा खरातच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

Rupali chakankar, prtaibha chakankar
Ashok Kharat Case : शिर्डी पोलिस 'ॲक्शन मोड'वर! बेकायदेशीर सावकारकी प्रकरणी खरातच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com