BJP Politics Sarkarnama
कोकण

BJP Politics : रायगड उत्तरमध्ये जुनाच चेहरा, दक्षिणमध्ये नव्याला संधी; अविनाश कोळी आणि धैर्यशील पाटलांच्या निवडीने भाजपला बळ

BJP District President Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील 58 शहर आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असून देशात आणि राज्यातील सत्ता भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. यानंतर भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड जाणार आहेत. पण त्याआधी मंडल अध्यक्षांची निवडणूक करण्यासह आता शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या पार पडल्या आहेत. आज भाजपने राज्यातील 58 शहर आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.

या नियुक्त्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण विभागाच्या जिल्हा अध्यक्षकांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा एकदा पनवेलचे अविनाश कोळी यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांचा या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर 2023 मध्ये जिल्हा अध्यक्षपदी अविनाश कोळी यांची नियुक्तीचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभेला मिळालेला यशानंतर उत्तर रायगडची पुन्हा एकदा जबाबदारी अविनाश कोळी यांच्याकडे देण्यात आली आहे. याआधी अविनाश कोळी यांनी अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपा अधिकाधिक मजबूत करण्याचे काम केलं आहे. तर आगामी स्थानिकसाठी या नियुक्तीमुळे अधिक बळ मिळणार आहे.

भाजपने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून जुन्याच चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. पण दक्षिणसाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय धैर्यशील पाटील यांना जिल्हा अध्यक्ष म्हणून दक्षिणची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपला बळ मिळणार?

जिल्ह्याचा विचार केल्यास 8 वर्षांपूर्वी जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत भाजपची सत्ता आणि नेते होते. येथे जिल्हापरिषदेत फक्त 3 सदस्य आणि महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. पण आता एक खासदार तीन आमदार आणि 810 ग्रामपंचायतीपैकी बहुसंख्य ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत रायगडमध्ये भाजप वरचढ दिसत असून आगामी स्थानिकसाठी जिल्ह्यात महायुती एकसंघ लढेल. येथे महायुतीविरोधात शेकाप अशी लढत होऊ शकते. येथे जिल्हापरिषद-1, महानगरपालिका-1, पंचायत समित्या-15, नगरपालिका - 10 आणि नगरपंचायती- 6 आहेत.

विरोधकांची पिच्छेहाट

जिल्ह्यात महाविकास आघाडी दिसत असली तरीही ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ची येथे राजकीय पिच्छेहाट झाली आहे. काँग्रेस कोठेच सक्रीय दिसत नाही. त्यातच आता शेकापला देखील गळती लागल्याने भाजपला जिल्ह्यात पूर्णपणे कमळ फुलवण्याची संधी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT