
मुंबई : भाजपच्या बहुप्रतिक्षित जिल्हाध्यक्षांची निवड अखेर जाहीर झाली आहे. आज (13 मे) रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 78 पैकी 58 जणांची नावे आहेत. यातील अनेक चेहरे हे जुनेच आहेत. तर जे नवीन आहेत ते त्या त्या जिल्ह्यातील आमदार-खासदारांचे निकटवर्तीय असतील याची काळजी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी आमदार किंवा खासदार यांनाच संधी देण्यात आली आहे.
याशिवाय अद्याप 20 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमधील एक, चंद्रपूर शहर आणि ग्रामीण, नाशिक अशा ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांची नावे अद्याप वेटिंगवरच आहेत. इथल्या नावांवर काही वाद किंवा अडचणी असल्याचे समजते. चंद्रपूरमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये जिल्हाध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरु आहे.
सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत
रत्नागिरी उत्तर - सतीश मोरे
रत्नागिरी दक्षिण - राजेश सावंत
रायगड उत्तर - अविनाश कोळी
रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील
ठाणे शहर - संदीप लेले
ठाणे ग्रामीण - जितेंद्र डाके
भिवंडी - रवीकांत सावंत
मीरा-भाईंदर - दिलीप जैन
नवी मुंबई - डॉ. राजेश पाटील
कल्याण - नंदू परब
उल्हासनगर - राजेश वधारिया
पुणे शहर - धीरज घाटे
पुणे उत्तर (मावळ) - प्रदीप कंद
पिंपरी चिंचवड शहर - शत्रुघ्न काटे
सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर
सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण
सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार
सातारा - अतुल भोसले
कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर
कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील
सांगली शहर - प्रकाश ढंग
सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक
नंदुरबार - निलेश माळी
धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर
धुळे ग्रामीण - बापू खलाने
मालेगाव - निलेश कचवे
जळगाव शहर - दीपक सुयवंशी
जळगाव पूर्व - चंद्रकांत बाविस्कर
जळगाव पश्चिम - राध्येश्याम चौधरी
अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर
अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग
नांदेड महानगर - अमर राजूरकर
परभणी महानगर - शिवाजी भरोसे
हिंगोली - गजानन घुगे
जालना महानगर - भास्करराव दानवे
जालना ग्रामीण - नारायण कुचे
छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते
धाराशिव - दत्ता कुलकर्णी
बुलढाणा - विजयराज शिंदे
खामगाव - सचिन देशमुख
अकोला महानगर - जयवंतराव मसणे
अकोला ग्रामीण - संतोष शिवारकर
वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे
अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे
अमरावती ग्रामीण (मोर्शी) - रवीराज देशमुख
यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण
पुसद - डॉ. आरती फुफाटे
मेळघाट - प्रभुदास भिलावेकर
नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी
नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत
नागपूर ग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे
भंडारा - आशु गोंडाने
गोंदिया - सिता रहांगडाले
उत्तर मुंबई - दीपक बाळा तावडे
उत्तर पूर्व मुंबई - दीपक दळवी
उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.