Navi Mumbai Belapur Court Sarkarnama
कोकण

Prisoner Death Case : बेलापूर न्यायालयात धक्कादायक घटना; जन्मठेपेची शिक्षा सुनावताच कैद्याची पाचव्या मजल्यावरून उडी; डॉक्टरांनी केले मृत घोषित

Navi Mumbai Belapur Court Prisoner Death Case : बेलापूर न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर नागेश लाड याने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली.

Aslam Shanedivan

Navi Mumbai News : नवी मुंबईतील बेलापूर न्यायालय परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर एका कैद्याचा न्यायालयाच्या इमारतीतून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागेश लाड असे मृत कैद्याचे नाव असून, तो तळोजा कारागृहात बंदिस्त होता. २०१९ मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणात बेलापूर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर न्यायालयात हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर नागेश लाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाचा निकाल समोर आल्यानंतर काही वेळातच न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी नागेश लाड याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, शिक्षा सुनावल्यानंतर तो मानसिक तणावात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर बेलापूर न्यायालय परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या इमारतीत कैद्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. खबरदारी म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनेचा तपास सुरू आहे. न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT